Rajkot TRP Game Zone Fire राजकोट : राजकोटच्या नाना मावा येथील टीआरपी गेम झोनमध्ये शनिवारी (25 मे) रोजी संध्याकाळी भीषण आग लागली. या अपघातात आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झालाय. मात्र मृतांच्या संख्येला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. इतर अनेक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान आगीच्या घटनेपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलय.
व्हिडिओमध्ये काय दिसले? टीआरपी गेम झोनचे सीसीटीव्ही फुटेज आग लागण्यापूर्वीच्या काही सेकंदांचे आहेत. फुटेजमध्ये गेम झोनच्या एका भागात वेल्डिंगचं काम सुरू होते. प्लायवूडचे काही तुकडे जमिनीवर पडलेले होत. वेल्डिंग सुरू असताना त्याच्यामधून ठिणग्या बाहेर पडू लागतात. काही वेळातच या ठिणग्यांचं रुपांतर ज्वाळांमध्ये होतं. तिथं उपस्थित कर्मचारी आग विझविण्याचा प्रयत्न करतात. परंतु आग पसरते. संपूर्ण गेम झोन आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना दिसतं. गेम झोनमध्ये येण्याचा आणि जाण्याचा एकच मार्ग होता. बाहेर पडलेल्यांचा जीव वाचला. पण ज्यांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. त्यांचा वेदनादायक मृत्यू झाला. या आगीत 28 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही लोक इतके जळाले की त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. काही मृतदेह राजकोट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहेत. तर 11 मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहेत.
घटनास्थळावरू ज्वलनशील पदार्थ जप्त : अधिकाऱ्यांनी गेमिंग झोनमधील दुरूस्ती साइटवरून अत्यंत ज्वलनशील कंपाऊंड इथाइल ऍसीटेटचे पाच ड्रम जप्त केले आहेत. याशिवाय मनोरंजन पार्क प्रशासकांच्या कार्यालयातूनही दारू जप्त करण्यात आली आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी तैनात करण्यात आलीय.
मुख्यमंत्र्यांनी घेतली शोकाकुल कुटुंबाची भेट : रविवारी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी राजकोट एम्स आणि इतर रुग्णालयांना भेट देऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. त्यांनी आगीत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. दरम्यान, राजकोट व्यापारी असोसिएशनने 27 मे रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याची घोषणा केलीय.
हेही वाचा
- डोंबिवली स्फोटात सापडलेल्या मृतदेहांची होणार डीएनए चाचणी, दोन बोटांवरून मृतदेहाची पटली ओळख - DOMBIVLI BLAST
- जेवणासाठी बस ढाब्यावर थांबविली अन् घात झाला... ११ यात्रेकरुंचा बस अपघातात मृत्यू - Shahjahanpur accident
- राजकोट गेमिंग झोन आग दुर्घटना : मृतांचा आकडा 30 वर, मुख्यमंत्र्यांनी दिली घटनास्थळी भेट; जाणून घ्या आतापर्यंत काय घडलं - Rajkot Fire Tragedy