ETV Bharat / bharat

मुंबईहून केरळला जाणऱया विमानात बॉम्ब? तिरुअनंतपुरम विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग - Bomb Threat on Air India Flight - BOMB THREAT ON AIR INDIA FLIGHT

Bomb Threat on Air India Flight : मुंबईहून केरळच्या तिरुअनंतपुरम (Mumbai to Thiruvananthapuram Flight) येथे येणाऱया एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यानंतर या विमानाचं तिरुअनंतपुरम विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

air india flight
एअर इंडिया विमान (ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2024, 10:49 AM IST

Updated : Aug 22, 2024, 11:26 AM IST

केरळ/मुंबई Bomb Threat on Air India Flight : मुंबईहून केरळच्या तिरुअनंतपुरम येथे एअर इंडियाचं विमान जात होतं. याचवेळी विमानात बॉम्ब असल्याची प्राथमिक माहिती (Mumbai to Thiruvananthapuram Flight) मिळाली. यानंतर विमानात एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती तिरुअनंतपुरम विमानतळ प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर या विमानतळावरही गोंधळ उडाला. यानंतर तिरुअनंतपुरम येथे या विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

बॉम्ब ठेवल्याची मिळाली धमकी : तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळानं जारी केलेल्या निवेदनानुसार, एअर इंडियाच्या फ्लाइट 657 (BOM-TRV) ला गुरुवारी सकाळी 7.30 वाजता बॉम्बची धमकी मिळाली. यानंतर विमानतळावर अलर्ट जारी करण्यात आला. यानंतर विमान सुरक्षित लँड करण्यात आलं असून, आयसोलेशन परिसरात या विमानाची तपासणी करण्यात येत आहे.

एअर इंडियाचं स्पष्टीकरण : 22 ऑगस्ट रोजी मुंबई ते तिरुवनंतपुरम या प्रवासादरम्यान एअर इंडियाच्या फ्लाइट AI657 वर एक विशिष्ट सुरक्षा अलर्ट आढळून आला. त्यानंतर विमान तिरुअनंतपुरम विमानतळावर सुरक्षितपणे उतरवलं. ज्या भागात प्रवासी किंवा कोणतीही वर्दळ नाही अशा भागात हे विमान पार्क करण्यात आलं. त्यानंतर सुरक्षा एजन्सीनं या विमानाची तपासणी केली. सर्व प्रवासी आणि क्रू सुरक्षित असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली.

मुंबई विमानतळावर लँढिंग : दरम्यान, असाच एक प्रकार जूनच्या सुरुवातीला घडला होता. पॅरिस चार्ल्स डी गॉल विमानतळावरून निघालेल्या विस्तारा विमानामध्ये धमकीची नोट सापडली होती. त्यात बॉम्ब असल्याचं सांगण्यात आलं होतं. यानंतर मुंबई विमानतळावर अलर्ट घोषित करण्यात आला. विमानात 294 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरवलं. त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी कसून तपास केला. मात्र, विमानात कोणताही संशयास्पद पदार्थ आढळला नाही.

हेही वाचा - ब्राझीलमध्ये प्रवासी विमान कोसळलं; 61 जणांचा मृत्यू, पाहा थरारक व्हिडिओ - Brazil Plane Crash

Last Updated : Aug 22, 2024, 11:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.