नवी दिल्ली BJP Releases 5th List : भाजपाकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आलीय. यामध्ये भंडारा-गोंदियात खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आलीय. गडचिरोलीमधून अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आलीय. तसंच सोलापुरात विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचं तिकीट भाजपानं कापलंय. त्याजागी आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपानं उमेदवारी दिलीय. त्यामुळे आता सोलापुरात आमदार विरुद्ध आमदार अशी लढत होणार आहे.
कंगना राणौतला उमेदवारी : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक नावं समोर आली आहेत. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला मंडीतून तिकीट देण्यात आलं आहे. वरुण गांधी यांचे तिकीट कापण्यात आलं आहे. मेनका गांधी यांचं नाव मात्र या यादीत आहे, त्या सुलतानपूरमधून उमेदवार असणार आहेत. या यादीत उत्तर प्रदेशातील उर्वरित जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यापूर्वी भाजपानं उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 51 जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते.
कंगनाची प्रतिक्रिया : "भारत आणि भारतीय जनता पक्ष या दोहोंवर माझं प्रेम आहे. मला भाजपाकडून कायमच पाठिंबा मिळाला. लोकसभेसाठी भाजपानं माझं नाव जाहीर केलं. माझं जन्मस्थान असलेल्या हिमाचलच्या मंडी या ठिकाणाहून मला उमेदवारी देण्यात आली आहे. माझ्यासाठी हा खूप मोठा बहुमान आहे. मी एक चांगली कार्यकर्ता होईन आणि लोकसेवेसाठी काम करेन."
वरुण गांधींचं तिकीट कापलं : मंडी मतदारसंघातून भाजपानं अभिनेत्री कंगना राणौतला उमेदवारी दिलीय. कुरुक्षेत्रातून नवीन जिंदाल यांचं तिकीट निश्चित झालंय. भाजपानं मेरठमधून अरुण गोविल यांना उमेदवारी दिलीय. वरुण गांधी यांचे नाव यादीत नाहीय, मात्र त्यांच्या आई मनेका गांधी यांना तिकीट देण्यात आलंय. भाजपाची पाचवी यादी येण्यापूर्वी कानपूरचे विद्यमान खासदार, भाजपा नेते सत्यदेव पचौरी यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिलाय. पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांना पाठवलेले पत्र त्यांनी सार्वजनिक केलंय. त्यात त्यांनी माझ्या उमेदवारीचा विचार करू नये, असं लिहिलं आहे.
लोकसभेच्या 111 जागांसाठी उमेदवार जाहीर : भाजपाच्या यादीत लोकसभेच्या 111 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत काँग्रेस सोडलेल्या नवीन जिंदाल यांना कुरुक्षेत्रमधून तिकीट देण्यात आलंय. या यादीत मनेका गांधी, जितिन प्रसाद, कंगना राणौत, रविशंकर प्रसाद यांच्यासह अनेकांची नावे आहेत. पिलीभीतचे विद्यमान खासदार वरुण गांधी यांचे नाव यादीतून कापण्यात आलंय. याशिवाय केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचेही तिकीट रद्द करून सीता सोरेन यांना दुमका (झारखंड) येथून उमेदवारी देण्यात आलीय.
हे वाचलंत का :
- महादेव जानकरांचा 'रासप' महायुतीत सामील; जानकरांना कुठली एक जागा मिळणार? - Mahadev Jankar
- काँग्रेसला मोठा धक्का; आमदार राजू पारवेंचा शिवसेनेत प्रवेश, रामटेक मतदारसंघातून उमेदवारी? - MLA Raju Parwe Joins Shivsena
- ठरलं! 'वंचित'चा स्वबळाचा नारा; प्रकाश आंबेडकर 'या' तारखेला भरणार अकोलामधून उमेदवारी अर्ज - Prakash Ambedkar