ETV Bharat / bharat

हाथरस चेंगराचेंगरीनंतर 'भोलेबाबा' फरार : आत्तापर्यंत 116 भक्तांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश - Hathras stampede - HATHRAS STAMPEDE

Hathras Stampede : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका सत्संगात झालेल्या अपघाताला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर नारायण साकार उर्फ ​​भोलेबाबा फरार झाला आहे. चेंगराचेंगरीत आत्तापर्यंत 116 नागरिकांच्या मृत्यूनंतर पोलीस कथित बाबाचा शोध घेत आहेत.

Bholebaba
नारायण साकार उर्फ ​​भोलेबाबा (Etv Bharat National desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 4:08 PM IST

लखनऊ Hathras Stampede : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. जिल्ह्यातील फुलराई गावात 'भोले'बाबाच्या प्रवचनाच्या समारोप कार्यक्रमानंतर अचानक चेंगराचेंगरी झाली. या अपघातात आत्तापर्यंत 116 हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. प्रशासनानं आतापर्यंत या 116 जणांची नावं सार्वजनिक केली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज सकाळी 11 वाजता हाथरसला पोहोचले आहेत. मात्र, या चेंगराचेंगरीमुळं 'भोले'बाबाच्या नावाची चर्चा सुरू आहे. नारायण साकार हरी उर्फ ​​'भोलेबाबा' असं या कथित बाबाचं नाव आहे.

'स्वयंघोषित भोलेबाबा फरार' : घटनेनंतर स्वयंघोषित भोलेबाबा फरार झाला आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलीस उपअधीक्षक सुनील कुमार यांनी सांगितलं की, उत्तर प्रदेश पोलिसांनी मैनपुरी जिल्ह्यातील हाथरसमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. सत्संग आयोजित करणाऱ्या स्वयंभू बाबाचा शोध सुरू आहे. या घटनेत आत्तापर्यंत 116 लोकांचा मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जलद मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले आहेत. तसंच घटनेची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी लोकांना दिलं आहे. हाथरस घटनेमागील सत्य बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह यांनी सांगितलं की, गर्दीमुळं चेंगराचेंगरी झाली आहे. सूत्रांनी सांगितलं की, सत्संगानंतर त्यांचे भक्त 'भोले'बाबाच्या वाहनामागे धावत होते. ज्यांना विश्व हरी भोले बाबा म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनीच या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक (डीजीपी) प्रशांत कुमार यांनी देखील चेंगराचेंगरीच्या ठिकाणी भेट दिली.

कोण आहे 'भोलेबाबा' : स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, एटामधील पटियाली येथील हरी हे आपल्या वडिलांना त्यांच्या शेतात मदत करत असत. नंतर ते पोलिसात रुजू झाले. उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्थानिक गुप्तचर विभागात त्यांनी काही काळ काम केलं. 17 वर्षांची कारकीर्द संपवून ते कथित 'भोलेबाबा' बनले. भोलेबाबा भगवे पोशाख घालण्याऐवजी पांढरा पोशाख घालतात. ते आपल्या पत्नीसह प्रवचन करतात. त्यामुळं त्यांच्याकडं अनेक भक्त आकर्षित झाले होते. पोलीस सेवेत असताना भोले बाबा पत्नीसोबत केदार नगर येथील ईडब्ल्यूएस घरात राहत होते. स्थानिक लोकांनी सांगितलं की बाबांनी आपल्या भावाच्या मुलीला दत्तक घेतलं होतं. सुमारे 29-30 वर्षांपूर्वी त्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तिला पुन्हा जिवंत करत असल्याचं सांगून बाबांनी मृतदेह दोन दिवस घरात ठेवला होता. त्यामुळं बाबा प्रसिद्धीच्या झोतात आले होते. मात्र, पोलिसांनी नंतर त्यांच्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन चबुतरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले होते.

'हे' वाचलंत का :

  1. ''पाण्यामुळं महिला घसरून पडल्या...'', सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं सत्य - Hathras Satsang Stampede
  2. सत्संगात चेंगराचेंगरी : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये 116 भाविकांचा मृत्यू, मृतांमध्ये 109 महिलांसह 7 मुलांचा समावेश - Hathras Satsang stampede
  3. राहुल गांधींनी भाजपाच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा उतरविला-संजय राऊत - Sanjay Raut news

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.