ETV Bharat / bharat

गलिच्छ कपडे परिधान केल्याबद्दल शेतकऱ्याला बंगळुरू मेट्रोत नाकारला प्रवेश, प्रशासनानं कर्मचाऱ्यावर केली कारवाई

कर्नाटकातील बंगळुरू शहरातील सार्वजनिक वाहतूक 'नम्मा मेट्रो'मध्ये शेतकऱ्याचा अपमान झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील राजाजीनगर मेट्रो स्टेशनवर घडली. एका शेतकऱ्यानं घाणेरडे कपडे परिधान केल्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला मेट्रोमध्ये चढण्यापासून रोखले. ही घटना 24 फेब्रुवारीला घडली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2024, 7:30 PM IST

Updated : Feb 26, 2024, 7:44 PM IST

Bengaluru Metro staff s
Bengaluru Metro staff s

बंगळुरू (कर्नाटक): मेट्रो कर्मचाऱ्यांचे शेतकऱ्याचा अपमान करणारे वर्तन प्रवाशाच्या मोबाईलमध्ये कैद झालं आहे. त्यानंतर जनतेमध्ये संताप व्यक्त झाला. जनतेचा संताप पाहून बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं (BMRCL) आरोपी कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केलं आहे.

शेतकऱ्याला आत जाऊ न दिल्यानं कर्मचाऱ्यांवर संतप्त झालेल्या सहप्रवाशांनी शेतकऱ्याला मेट्रो स्टेशनच्या प्रवेश मिळवून दिला. मात्र, शेतकऱ्याला मेट्रोत प्रवेश नाकारल्यानं सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. ''तुम्ही चांगले कपडे घातले असाल तरच तुम्हाला मेट्रोमध्ये प्रवेश दिला जाणार का? गरिबांना मेट्रो प्रवास सेवा मिळू शकत नाही का?'' असा सवाल जनतेनं सोशल मीडियावर केला आहे.

बीएमआरसीएलने या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले आहे की, "नम्मा मेट्रो हे सर्व लोकांसाठी सुलभ आणि सार्वजनिक वाहतुकीचं सर्वांसाठीचं साधन आहे. राजाजीनगर मेट्रो स्थानकात ही घटना घडली. याची चौकशी करण्यात आली आहे. तेथे तैनात असलेल्या सुरक्षा पर्यवेक्षकाच्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. आम्ही प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत." बीएमआरसीएलचे एमडी एम. महेश्वर राव यांनी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचा आदेश दिले आहेत. तसेच चौकशीचं आश्वासनही दिले आहे.

नेमकी काय घडली घटना?- तिकीट खरेदी करूनही शेतकऱ्याला ट्रेनमध्ये चढू दिले जात नसल्याचे पाहून कार्तिक सी. ऐरानी या प्रवाशानं अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला होता. एका व्यक्तीला त्याच्या कपड्यांवरून अन्याय केला जात असल्यानं त्यानं सुरक्षा पर्यवेक्षकाशी वाद घातला होता. मात्र, सुरक्षा पर्यवेक्षकानं नियम असल्याचं ठामपणं सांगितले. जर शेतकऱ्याला मेट्रोत प्रवेश दिला तर इतर प्रवाशांना त्रास होईल, अशी थापदेखील त्यानं मारली. त्यानंतर काही तास वाट पाहिल्यानंतर शेतकऱ्याला नाईलाजानं स्टेशनबाहेर जावे लागलं.

जनतेमधून संताप- घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच युझर्सनं संताप व्यक्त केला. एका युझरनं म्हटलं, " "अविश्वसनीय आहे! मेट्रो फक्त व्हीआयपीसाठी आहे का? मेट्रो वापरण्यासाठी ड्रेस कोड असतो का? राजाजीनगर मेट्रो स्टेशनवर शेतकऱ्याच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्तिक सी, ऐरानी यांच्या कृतीचे मी कौतुक करतो. अशा धाडसी नागरिकांची आपल्याला सर्वत्र गरज आहे. BMRCL ने अधिकाऱ्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

हेही वाचा-

  1. वाह रे पठ्ठ्या ; मांजात अडकलेल्या पोपटाचा जीव वाचवण्यासाठी चालवली मेट्रो, पाहा व्हिडिओ
  2. पुणे मेट्रोची ऐतिहासिक कामगिरी, मुठा नदीखालून यशस्वी चाचणी

Last Updated : Feb 26, 2024, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.