मुबंई Hill Stations in Maharashtra : एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर शाळा कॉलेजचा सुट्ट्यांचा काळ सुरू होतो. त्यामुळं या दिवसात ट्रीपचं प्लॅनिंग केलं जातं. मग वाढत्या उन्हापासून थोडासा दिलासा मिळावा म्हणून एखादी ट्रीप प्लॅन करण्याचा विचार करत असाल तर, या महाराष्ट्रातील या पाच थंड हवेच्या ठिकाणांचा नक्की विचार करून पहा.
महाबळेश्वर (Mahabaleshwar) : महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण म्हटलं की, महाबळेश्वरचं नाव पहिलं घेतलं जातं. महाबळेश्वर हे किमान दोन ते तीन दिवस फिरण्यासारखं ठिकाण आहे. जर तुम्ही या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल आताचा काळ हा याठिकाणी जाण्यासारखा आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्यानंतर महाबळेश्वर बाजार, प्रतापगड, मॅप्रो गार्डन, वाई, स्ट्रॉबेरी फार्म अशी ठिकाण पाहण्यासारखी आहेत.
लोणावळा (Lonavala) : मुंबई आणि पुण्यापासून जवळ असलेल्या लोणावळामध्ये फिरण्यासारखं बरेच काही आहे. लोणावळामध्ये वर्षभर पर्यटकांची वर्दळ सुरु असते. लोणावळा म्हटलं की, चिक्की ही आवर्जून घेतली जाते. या ठिकाणी तुम्हाला ठिकठिकाणी चिक्कीची दुकानं दिसतील. त्यामुळं तुम्ही अगदी कोणत्याही सीझनमध्ये या ठिकाणी जाऊ शकता. येथील सनसेट पॉईंट, वॅक्स म्युझिअम, भुशी डॅम अशी काही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत.
माथेरान (Matheran) : मुंबईपासून अगदी जवळ असलेलं पर्यटनाचं ठिकाणं म्हणजे माथेरान. माथेरानमध्ये फिरण्यासारखं बरीच पॉईंट असली तरी तुम्ही दोन दिवस राहून माथेरान फिरु शकता. फोटो काढण्यासाठी माथेरान हे एकदम उत्तम ठिकाण आहे. फक्त प्रवासाचा थोडा तुम्हाला कंटाळा येऊ शकतो.
चिखलदारा (Chikhaldara) : सातपुडा पर्वतरांगेत एक हजार मीटर उंचीवर असलेले चिखलदरा विदर्भातील एकमेव थंड हवेचं ठिकाण आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि गुगामल नॅशनल पार्क याच भागात आहे. उंचावरून कोसळणारे धबधबे रौद्रभीषण सौंदर्याची अनुभूती देतात. विस्तीर्ण पसरलेली नैसर्गिक तळी मनाला शांती देतात. येथील आल्हाददायक वातावरणामुळं स्वर्गाचाच अनुभव येतो.
आंबोली (Amboli) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील आंबोली हे थंड हवेचं ठिकाण आहे. हे गाव लाकडी कलाकुसरीच्या वस्तू आणि हस्तकला उद्योगांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. लाकडी खेळणी, मेणाची आणि लाकडाची हुबेहूब दिसणारी फळे, वेताच्या आणि बांबूच्या छड्या, रंगीत पाट, दरवाज्याला लावायच्या माळ, शोभेच्या वस्तू येथे तयार केल्या जातात.
हेही वाचा -