ETV Bharat / bharat

अयोध्येतील 'या' प्रसिद्ध मिठाई खाण्यासाठी लोक दूरदूरवरुन येतात, जाणून घ्या काय आहे खासियत

Ayodhya Famous Sweets : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर रामनगरी पूर्णपणे राममय दिसू लागली आहे. रामलल्लाच्या भक्तीसोबतच लोक इथल्या चवींचाही आस्वाद घेत आहेत. दरम्यान, रामनगरीच्या दोन प्रसिद्ध मिठाईंविषयी आपण जाणून घेऊया.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 29, 2024, 10:19 AM IST

Ayodhya Two sweets quite famous, People come from far and wide to eat, Know specialty
अयोध्येतील 'या' प्रसिद्ध मिठाई खाण्यासाठी लोक दूरदूरवरुन येतात, जाणून घ्या काय आहे खासियत
अयोध्येतील मिठाई आहे प्रसिद्ध

अयोध्या Ayodhya Famous Sweets : रामनगरीत सर्वत्र रामनामाचा जप सुरू आहे. तसंच रस्ते, गल्ल्या आणि परिसर भगव्या झेंड्यांनी झाकले आहेत. रामलल्लांचे दर्शन आणि पूजा करण्याबरोबरच येथे येणारे लोक या ठिकाणच्या चवीचाही आस्वाद घेत आहेत. येथील हनुमान गढीचे लाडू आणि खूरचन पेढा खूप प्रसिद्ध आहेत. हनुमान गढीतील जवळपास सर्वच दुकानांमध्ये या मिठाई मिळतात. दरम्यान, या मिठाईंविषयी आपण जाणू घेऊया.

हनुमानगढीचे बेसनाचे लाडू : हनुमानगढीचे लाडू अयोध्येतील सर्वात प्रसिद्ध मिठाईंमध्ये गणले जातात. हे लाडू इथे आजच नव्हे तर शेकडो वर्षांपासून विकले जात आहेत. हे लाडू इतके खास आहेत की यांना लवकरच GI टॅग मिळू शकतो. यासंदर्भात शिफारसदेखील करण्यात आली आहे. हे लाडू खाण्यासाठी दूरवरुन लोक येत असतात. हे लाडू पारंपारिक पद्धतीने बनविले जातात.

कसे तयार होतात लाडू : हनुमानगढीचे लाडू ऑर्डरनुसार आणि नियमित स्वरूपात देखील बनवले जातात. यात साखर, बेसन आणि तूपाचा वापर करण्यात येतो. सर्वप्रथम हे सर्व भाजून एकत्र मिसळले जातात. यानंतर त्याचे लाडू बनवले जातात. त्यानंतर हे लाडू हनुमानगढीतील मिठाईच्या दुकानांमध्ये पाठवले जातात. येथेस्थानिक आणि ओरिजिनल अशा दोन पद्धतींचे लाडू तयार केले जातात. येथील तुपाचे लाडू प्रसिद्ध असून बहुतेक लोक हे लाडू खरेदी करतात. हे लाडू भाविक हनुमंतला अर्पण करतात.

हनुमानगढीचा खूरचन पेढा : अयोध्येतील हनुमानगढी परिसरात असलेल्या दुकानांमध्ये लाडूंसोबतच खूरचन पेढ्यालाही मोठी मागणी आहे. या पेढ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते जिभेवर लगेच विरघळतात. हे बनवण्यासाठी खवा बराच वेळ शिजवला जातो, यानंतर त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स टाकले जातात. काही दुकानांमध्ये या पेढ्यांसाठी फक्त वेलची आणि साखरेचा वापर केला जातो. दरम्यान, हा पेढा खाण्यासाठी परदेशातूनही लोकं येत असतात, असं स्थानिक दुकानदारांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. अनोखा रामभक्त; दररोज 500 वेळा लिहतो रामनाम, आतापर्यंत 50 लाख वेळा 'राम' लिहिल्याचा दावा
  2. रामलल्लांच्या डोक्यावर सजणार तब्बल 11 कोटींचा हिऱ्यांचा मुकुट, राम मंदिरात भेटवस्तूंचा ढीग
  3. रामलल्लाच्या दर्शनासाठी स्वत: हनुमानजी आले! प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्याच दिवशी राम मंदिरात काय घडलं?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.