ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये हिमस्खलन, रशियन पर्यटकाचा मृत्यू; सहा जणांना वाचवण्यात यश

Gulmarg Avalanche : जम्मू काश्मीरमधील गुलमर्गमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळं एका रशियन स्कीयरचा मृत्यू झाला आहे. स्थानिक मार्गदर्शकासह सहा जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे.

Gulmarg Avalanche
गुलमर्ग हिमस्खलन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 6:32 PM IST

जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये हिमस्खलन

गुलमर्ग Gulmarg Avalanche (जम्मू-काश्मीर) : जम्मू-काश्मीरमधील गुलमर्गमध्ये मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन झाल्यानं अनेक पर्यटक बर्फात अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सैन्य आणि स्थानिक पोलिसांनी बचावकार्य सुरू केलंय. बचाव कार्यात हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे. यावेळी भारतीय सैन्यानं 6 जणांना सुरक्षितपणं बाहेर काढलं. तर एका रशियन स्कीयरचा मृत्यू झाला आहे.

जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये हिमस्खलन

एका रशियन स्कीयरचा मृत्यू : जम्मू-काश्मीरमधील गुलमर्गमध्ये गुरुवारी हिमस्खलनामुळं एका रशियन स्कीयरचा मृत्यू झाला आहे. तसंच स्थानिक मार्गदर्शकासह सहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे. गुलमर्गच्या कोंगदूरीत दुपारी 2 वाजता हिमस्खलन झालं. त्यामुळं अनेक स्कीअर ढिगाऱ्याखाली अडकले, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यात सहा रशियन स्कीअरसह स्थानिक मार्गदर्शकाला बचावकर्त्यांनी ढिगाऱ्यातून बाहेर काढलंय. ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या सहा जणांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अनेक लोक अद्याप बेपत्ता : जम्मू-काश्मीरमधील गुलमर्गमधील स्की टाऊनमध्ये झालेल्या हिमस्खलनानंतर अनेक लोक अद्याप बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात अनेक परदेशी पर्यटकही असू शकतात. तत्पूर्वी, अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गुलमर्गच्या वरच्या भागात कोंगदुरी उताराजवळ आज प्रचंड हिमस्खलन झालं. माहिती मिळताच सैन्याचे जवान, जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या गस्ती पथकानं बचावकार्य हाती घेतलं.

जम्मू-काश्मीरचा राष्ट्रीय महामार्ग बंद : दुसरीकडं, भूस्खलनामुळं जम्मू-काश्मीरचा राष्ट्रीय महामार्ग गुरुवारी सलग चौथ्या दिवशीही बंद राहिला. वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळं श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद राहिला. वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'महामार्ग पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व काही सुरळीत झाल्यास 3 ते 4 तासांत महामार्ग पूर्ववत होईल.

हे वाचलंत का :

  1. Uttarkashi Tunnel Collapsed : सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी झाला संपर्क; ऑक्सिजन पुरविण्याची केली मागणी
  2. Landslide in Uttarakhand : उत्तराखंडात निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन झाल्यानंतर 36 मजूर अडकले, बचावकार्य सुरू
  3. House Collapsed In Joshimath : भूस्खलनामुळे घराच्या मलब्याखाली दबून दोघांचा मृत्यू, चार जणांना वाचवण्यात यश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.