ETV Bharat / politics

ऐन प्रचारावेळी आमदाराच्या मुलाचं अपहरण; नग्न व्हिडिओ काढल्याचा आरोप - RUSHIKESH PAWAR

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच शिरुरचे आमदार अशोक पवार यांचा मुलगा ऋषीराज पवार याचं अपहरण केल्याचा दावा करण्यात आला.

Rushikesh Pawar
ऋषीराज पवार (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2024, 10:28 PM IST

Updated : Nov 10, 2024, 3:23 PM IST

पुणे : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच शिरूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं दुपारी अपहरण करुन एका खोलीत कोंडून नग्न अवस्थेत एका महिलेसोबत न्यूड व्हिडिओ शूट करण्यात आल्याचा दावा आमदार अशोक पवार यांचा मुलगा ऋषीराज पवार यांनी केला.

शिरूर पोलीस स्टेशनात तक्रार दाखल : आमदार अशोक पवार यांचा मुलगा ऋषीराज पवार याच्याकडून शिरूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली. याबाबत अँड. असीम सरोदे, मुलगी आम्रपाली पवार, अँड. श्रेया आवले यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. या प्रकरणात एकास अटक करण्यात आली.

प्रतिक्रिया देताना ऋषीराज पवार (ETV Bharat Reporter)

अपहरण करून बनवला व्हिडिओ : यावेळी वकील असीम सरोदे म्हणाले की, "शिरूर हवेली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक पवार हे उमेदवार असताना निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होत असतात. पण आज त्यांच्या मुलावर जो प्रसंग झाला तो अत्यंत वाईट आहे. ऋषीराज पवार हा प्रचाराला जात असताना चार दिवसांपूर्वी ओळख झालेल्या भाऊ कोळपे नावाच्या कार्यकर्त्याने ऋषीराज पवार याला आपल्याला एका मीटिंगला जायचं असं सांगितलं आणि शिरूर मतदारसंघातील मांडवगण फराटा या गावातील एका घरात घेऊन गेले. तेथे दोन साथीदारांना बोलावून दरवाज्याला कडी लावून ऋषीराज पवार याचे हातपाय बांधले आणि तिथं एका महिलेला आणून दोघांचे नग्न व्हिडिओ काढण्यात आले."

कशी घडली घटना : यावेळी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आमदार अशोक पवार यांचा मुलगा ऋषीराज पवार यानं सांगितलं की, "भाऊ कोळपे नावाचा एक कार्यकर्ता होता जो अगोदर विरोधात होता. मात्र चार दिवसापासून आमचा प्रचार करत होता आणि चार दिवसापासून त्याचे मला फोन येत होते. आपल्याला काही लोकांसोबत मीटिंग करायची आहे. मात्र, मी प्रचारात असल्यानं टाळाटाळ करत होतो. शनिवारी सकाळपासूनच मी प्रचारात असताना आमचं ठरलं होतं की, आज दुपारच्या वेळेस आमच्या एका सहकाऱ्याच्या घरी जेवायचं आहे. त्यावेळेस हा भाऊ कोळपे नावाचा कार्यकर्ता माझ्याजवळ आला आणि म्हणाला की, आपण जेवायच्या आधी मीटिंग करून येऊ. मी त्याला माझ्या चारचाकी वाहनात घेऊन गेलो. येथील एका गावात गेल्यावर त्यांनी सांगितलं की, पुढे चारचाकी वाहन घेऊन जाता येणार नाही तर आपण पुढे दुचाकी घेऊन जाऊ आणि पुढे दुचाकी घेऊन गावातील एका घरात गेलो. तिथं त्याने दोन जणांना बोलावलं आणि माझे हातपाय पकडले. माझी आणि त्या तिघांची काही काळ झटापट देखील झाली. परत त्यांनी मला मारायची धमकी दिली."

प्रतिक्रिया देताना आमदार अशोक पवार (ETV Bharat Reporter)

अशी केली सुटका : "माझे हातपाय बांधून कपडे काढले. त्यानंतर महिलेला बोलवलं आणि तिच्यासोबत नग्न अवस्थेत व्हिडिओ काढला. तसेच समोरच्या पार्टीने या व्हिडिओसाठी 10 कोटींची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. मी त्यांना पैसे देण्याचा विश्वास व्यक्त केला आणि त्यांना पैसे देतो अस सांगून माझ्या मित्राच्या इथं चला असं सांगितलं. तेव्हा मी माझ्या मित्रांना मेसेज करून ठेवला होता. हा जेव्हा मला घेऊन मित्राजवळ आला तेव्हा माझ्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडलं. मात्र, त्याच्यासोबत असलेल्या एकानं ते पाहिलं आणि त्या गावातील लोक हत्यार घेऊन आमच्या जवळ आले. मात्र त्यानंतर पोलिसांनी या भाऊ कोळपेला पकडलं. त्यानंतर मी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली," असं ऋषीराज पवार यानं सांगितलं.

हेही वाचा -

  1. खोटं बोल पण रेटून बोल हेच त्यांचं धोरण...; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप
  2. "...म्हणून योगींना महाराष्ट्रात आणलं"; 'बटेंगे तो कटेंगे'वरून शरद पवारांचा घणाघात, अशोक चव्हाणांवरही साधला निशाणा
  3. "भाजपा म्हणजे भारतीय लबाड पक्ष"; नरेंद्र मोदींच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी तेलंगणा-हिमाचलचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री मुंबईत

Last Updated : Nov 10, 2024, 3:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.