ETV Bharat / politics

"महायुती आणि मविआला गुडघे टेकायला भाग पाडू"; राजू शेट्टींनी दिला इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी महायुती आणि महाविकास आघाडीला इशारा दिलाय. 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
राजू शेट्टी (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2024, 9:47 PM IST

कोल्हापूर : काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर महायुतीचा अनुभव पाठीशी असल्यामुळं सर्वसामान्य पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना महाशक्ती परिवर्तन आघाडीकडून रिंगणात उतरवण्यात आलं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाशक्ती परिवर्तन आघाडी गेम चेंजर ठरेल, तसंच निवडून येणाऱ्या आमदारांच्या बळावर महायुती आणि महाविकास आघाडीला गुडघे टेकायला भाग पाडू, असा इशारा तिसऱ्या आघाडीचे नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीतून दिला.

जाहीरनाम्यात शेतकऱ्याचा उल्लेखही नाही : "राज्य कृषी प्रधान असूनही सत्ता भोगलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीनं आपल्या जाहीरनाम्यात राज्यातील बळीराजाबाबत कोणतीही ठोस घोषणा केलेली नाही. याची किंमत त्यांना मोजावी लागेल. 9 हजार प्रतिक्विंटल दर असलेला सोयाबीन 2 वर्षात 4 हजारांवर आला, दहा हजारांचा कापूस साडेचार हजारांवर आला, कांदा, मका दुधाच्या उत्पादनाचं वाटोळं झालं. साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली नसती, तर उसाला प्रति टन अजूनही 1 हजार रुपये शेतकऱ्याला जादा मिळाले असते. मात्र, केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घालून बळीराजाला फसवलं. शेतकरी विरोधी धोरण राबवून सरकार शेतकऱ्याला खड्ड्यात घालत आहे. जाहीरनाम्यात साधा शेतकऱ्याचा उल्लेखही केला जात नाहीय. विधानसभा निवडणुकीत त्यांना धडा शिकवल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही," असा इशारा राजू शेट्टी यांनी महायुती आणि महाविकास आघाडीला दिला.

राजू शेट्टी यांची विशेष मुलाखत (Source - ETV Bharat Reporter)

साखर कारखानदारांना आमदारकीचं कवच कुंडल : राजू शेट्टी पुढं बोलताना म्हणाले, "कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा जागांवर 13 उमेदवार साखर कारखानदार आणि दोघे साखर कारखानदारांचे हस्तक असे मिळून 15 उमेदवार उभे आहेत. प्रचंड गैरव्यवहार करून या साखर कारखानदारांनी एका मताचा आकडा दोन हजारांवर नेऊन ठेवलाय. साखर कारखानदारांनी केलेला गैरव्यवहार झाकून ठेवण्यासाठी त्यांना आमदारकीचं कवच कुंडल लागतं, सत्तेचं कवच कुंडल लागतं, त्यांना ते मिळवून द्यायचं नाही, अशी रणनीती यंदा आम्ही बनवली आहे."

चळवळ ही नेहमी प्रभावी असते : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टींचे अनेक शिलेदार त्यांना सोडून गेले आहेत. अनेकांनी उमेदवारी मिळाली नसल्यानं जाहीर नाराजी व्यक्त केली. मात्र, राजू शेट्टींनी याचं खंडन करत चळवळ ही नेहमी प्रभावी ठेवावी लागते. जुने जाणकार शिलेदार सोडून गेले असले, तरी नवी पिढी शेतकरी चळवळीकडे आकृष्ट होत आहे. ही सकारात्मक गोष्ट असून या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांच्या बळावरच या निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं राजू शेट्टी म्हणाले.

विधानसभा निवडणुकीनंतर परिवर्तन महाशक्ती निर्णायक असेल : "राज्याच्या राजकारणाची समीकरणं पाहता कोणत्याही आघाडी आणि युतींना बहुमत मिळेल, असं वाटत नाही. त्यामुळं परिवर्तन महाशक्ती राज्यात निर्णय भूमिकेत असणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या मानकोटीवर बसून जनतेचा जाहीरनामा मांडू आणि महाशक्ती परिवर्तन आघाडीकडून विजयी होणाऱ्या उमेदवारांच्या जीवावर महाविकास आघाडी आणि महायुतीला गुडघे टिकायला भाग पाडू," असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

हेही वाचा

  1. खोटं बोल पण रेटून बोल हेच त्यांचं धोरण...; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप
  2. "भाजपा म्हणजे भारतीय लबाड पक्ष"; नरेंद्र मोदींच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी तेलंगणा-हिमाचलचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री मुंबईत
  3. "...म्हणून योगींना महाराष्ट्रात आणलं"; 'बटेंगे तो कटेंगे'वरून शरद पवारांचा घणाघात, अशोक चव्हाणांवरही साधला निशाणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.