ETV Bharat / bharat

अरुणाचलमध्ये भाजपाची सत्ता कायम, सिक्कीममध्ये एसकेएमनं बहुमताचा आकडा केला पार - Assembly Election results - ASSEMBLY ELECTION RESULTS

Sikkim Arunachal Pradesh Assembly Election Result : अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज (2 जून) सकाळी 6 वाजता सुरू झाली आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या 60 जागांपैकी 50 जागांवर मतदान झाले. येथे भाजपाचे 10 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. सिक्कीम विधानसभेच्या 32 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे.

Assembly Election results BJP to retain power in arunachal ruling SKM in sikkim crosses majority
विधानसभा निवडणूक निकाल (Source ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 2:13 PM IST

नवी दिल्ली Sikkim Arunachal Pradesh Assembly Election Result : अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार अरुणाचल प्रदेशात सत्ता टिकवण्यासाठी सज्ज आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, पक्षानं 30 जागा मिळवून बहुमताचा आकडा पार केलाय. तर भाजपानं अगोदरच 10 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत.

आकडेवारी काय सांगते? : निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भारतीय जनता पक्ष अरुणाचल प्रदेशमध्ये 30 जागांवर आघाडीवर आहे. यात लुमला, कालाकतांग, कोलोरियांग, नाचो, लिकाबली, बसर, अलॉन्ग (पश्चिम), अलॉन्ग (पूर्व) या जागेंचा समावेश आहे. अरुणाचल विधानसभेत बहुमताचा आकडा 31 आहे. नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीईपी) आठ जागांवर, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) दोन जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) तीन जागांवर, काँग्रेस एक आणि अपक्ष दोन जागांवर आघाडीवर आहे.

2019 ला अशी होती परिस्थिती : 2019 मध्ये अरुणाचलमध्ये भाजपानं 42 जागा जिंकून सरकार स्थापन केलं होतं. त्याच वेळी, सिक्कीममधील 32 जागांपैकी सिक्कीम क्रांती पार्टी 17 जागांवर विजय मिळवला होता.

एसकेएमनं बहुमताचा आकडा केला पार : सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) पुन्हा एकदा सहज विजयाकडं वाटचाल करत असल्याचं बघायला मिळतंय. पक्ष 29 जागांवर आघाडीवर असून विरोधी सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) एका जागेवर पुढं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासोबतच अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेच्या 60 जागांसाठी 19 एप्रिल रोजी मतदान झालं होतं. सिक्कीममध्ये एकूण 79.88 टक्के मतदान झालं. तर अरुणाचल प्रदेशमध्ये 82.95 टक्के मतदान झालं होतं.

हेही वाचा -

  1. एक्झिट पोलनुसार महायुतीचे राज्यातील ४० जागांचे स्वप्न धुसरचं, महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? - Exit Polls 2024
  2. 'एक्झिट पोल' जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये रणनीती आखण्याकरिता हालचाली सुरू, राहुल गांधी आज घेणार बैठक - Exit Poll 2024
  3. महाराष्ट्रात 'एक्झिट पोल'नुसार महायुतीचं पारडं जड; ज्येष्ठ पत्रकारांना काय वाटतं? - Lok Sabha Election result

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.