ETV Bharat / bharat

अडवाणींचा नियम मोदींना का लागू होत नाही? अरविंद केजरीवालांचे मोहन भागवतांना 5 प्रश्न - Arvind Kejriwal on Mohan Bhagwat - ARVIND KEJRIWAL ON MOHAN BHAGWAT

Arvind Kejriwal Janata Ki Adalat : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पाच प्रश्न विचारले. कोणते आहेत ते प्रश्न? वाचा सविस्तर...

Arvind Kejriwal Janata Ki Adalat
अरविंद केजरीवालांचे मोहन भागवतांना प्रश्न (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2024, 5:31 PM IST

नवी दिल्ली Arvind Kejriwal Janata Ki Adalat : आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी जंतरमंतर मैदानावर आयोजित 'जनता की अदालत'मध्ये भाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. "भाजपाच्या नेत्यांना केसेस आणि खटल्यांची पर्वा नाही, त्यांची चमडी जाड आहे. पण मी तसा नाही. माझी चमडी जाड नाही. मला चोर आणि भ्रष्टचारी म्हटलं तर फरक पडतो, म्हणूनच मी आज खूप दु:खी आहे. माझ्या मनाला खूप वेदना होत आहेत. म्हणून मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला," असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी मोदींसह भाजपावर टीका केली.

22 राज्यात भाजपाचं सरकार पण... : अरविंद केजरीवाल पुढं म्हणाले, "मी जर बेईमान असतो, तर दिल्लीला मोफत वीज कशी दिली असती? वीज बिल मोफत देण्यासाठी 3,000 कोटी रुपये लागतात. बेईमान असतो तर दिल्लीतील जनतेला मोफत वीज, शिक्षण, आरोग्य देऊ शकलो नसतो. सर्व पैसे मी खाऊन टाकले असते. 22 राज्यात भाजपाचं सरकार आहे, पण कुठेच मोफत वीजेची सोय नाही, महिलांना मोफत प्रवास मोफत नाही. मग बेईमान कोण?."

अरविंद केजरीवाल यांनी रविवारी 'जनता की अदालत'मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पाच प्रश्न विचारले. आरएसएसचे लोक म्हणतात की, आम्ही देशभक्त आहोत. त्यामुळं मला मोहन भागवत यांना पाच प्रश्न विचारायचे आहेत, असं केजरीवाल म्हणाले. तसंच प्रश्न विचारताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला.

केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच प्रश्न पुढीलप्रमाणे :

  1. पंतप्रधान मोदी देशभरात आमिष देऊन किंवा ईडी-सीबीआयची धमकी देऊन घाबरवतात, इतर पक्षाच्या नेत्यांना फोडतात. भारतीय लोकशाहीसाठी हे घातक आहे. हे तुम्हाला योग्य वाटतं का?
  2. भ्रष्ट नेत्यांना मोदी आपल्या पक्षात सामील करून घेतात. ज्या नेत्यांना काही दिवस आधी मोदी हे भ्रष्टाचारी म्हणाले, ज्या नेत्यांना अमित शाह भ्रष्टाचारी म्हणाले. त्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला जातोय. अशा प्रकारच्या राजकारणाशी तुम्ही सहमत आहात का?
  3. भाजपाच्या आजच्या वाटचालीबद्दल तुम्ही सहमत आहात का? चुकीच्या गोष्टी करण्यापासून मोदींना कधी रोखलं का?
  4. भाजपाला 'आरएसएस'ची आता गरज नाही, असं जेपी नड्डा लोकसभा निवडणुकीच्यावेळी म्हणाले होते. जेपी नड्डा यांच्या या विधानानंतर तुम्हाला दुःख झालं का? कार्यकर्त्यांना दुःख झालं का?
  5. 75 वर्षांनी नेते निवृत्त होतील हा नियम सरकारनं काढला. मात्र, हा नियम मोदींना लागू होणार नाही, असं अमित शाह सांगत आहेत. जो नियम अडवाणींना लागू झाला, तो मोदींना लागू व्हायला नको का? तुम्ही याच्याशी सहमत आहात का?

केजरीवाल यांचा तिखट प्रश्न : असे पाच प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी मोहन भागवत यांना विचारले. यात पाचवा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. अडवाणी यांना भाजपानं राजकारणातून निवृत्त केल्याचा आरोप विरोधक करतात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजपा निवृत्त का करत नाही? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला.

हेही वाचा

  1. "भाजपाचा सुपडासाफ निश्चित"; सत्यपाल मलिक यांचा हल्लाबोल, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाले... - Satya Pal Malik on BJP
  2. दिल्लीत 'महिलाराज'! आतिशींनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; याआधी कोण होत्या महिला मुख्यमंत्री? - Atishi Delhi New CM
  3. लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढल्या : गृहमंत्रालयानं दिली सीबीआयला खटला चालवण्यास परवानगी - Lalu Prasad Yadav Laand For Job

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.