ETV Bharat / bharat

लखनऊला येणाऱ्या एयर इंडिया विमानाचं दुबई विमानतळावर इमर्जन्सी लँडींग - Emergency Landing In Dubai

Emergency Landing In Dubai : लखनऊला येणाऱ्या एयर इंडिया विमानतळावर इमर्जन्सी लँडींग करण्यात आलं. मात्र लखनऊ विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Emergency Landing In Dubai
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 2:22 PM IST

लखनऊ Emergency Landing In Dubai : दुबईहून लखनऊला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं तांत्रिक कारणानं दुबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या विमानातील सगळ्या प्रवाशांना दुबई विमानतळावर सुखरुप उतरवण्यात आलं आहे. सोमवारी लखनऊ विमानतळावर येणारी आणि जाणारी चार उड्डाणं तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आली आहेत. विमानाचं इमर्जन्सी लँडींग करण्यात आल्यानं प्रवाशांना नाहक त्रास सहन कारावा लागला.

Emergency Landing In Dubai
सोशल माध्यमात देण्यात आलेली माहिती (ETV Bharat)

एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडींग : एअर इंडियाचं फ्लाइट क्रमांक IX 194 हे दुबईतून लखनऊला येण्यासाठी निघालं होतं. मात्र या विमानाला तांत्रिक कारणामुळे पुन्हा दुबई विमानतळावर उतरवण्यात आलं. विमान परत दुबई विमानतळावर उतरवण्यात आल्यानं प्रवाशांनी मोठा संताप व्यक्त केला. एयर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी इमर्जन्सी लँडींगचं कारण न दिल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत सोशल माध्यमातून एयर इंडियाच्या प्रशासनावर चांगलाच हल्लाबोल केला. प्रवाशांनी सोशल मीडिया हँडल एक्सवर प्रश्न विचारले. यावेळी एअर इंडिया प्रशासनानं ऑपरेशनल कारण म्हणून आपत्कालिन लँडिंगचं कारण सांगितलं.

लखनऊ विमानतळावरील दोन विमानं उड्डाणं रद्द : स्टार एअरचे फ्लाइट क्रमांक एस 5223 सोमवारी लखनऊवरुन किशनगडसाठी 15:00 वाजता निघणार होतं. मात्र लखनऊ विमानतळावर हे विमान रद्द करण्यात आलं. इंडिगोचं लखनऊवरुन बंगळुरुला जाणारं विमान संध्याकाळी 19.50 वाजता रद्द करण्यात आलं. सोमवारी रात्री 19:20 वाजता बंगळुरुहून लखनऊला येणारं फ्लाइट रद्द करण्यात आलं. तर फ्लाइट क्रमांक एस 522 किशनगडहून 14:25 वाजता येणारं फ्लाइट रद्द करण्यात आलं. लखनऊवरुन मुंबईला जाण्यासाठी इंडिगोच्या फ्लाइटला एक तास उशीर करण्यात आला. इंडिगोच्या फ्लाइटला दिल्लीला एक तास उशीर करण्यात आला. लखनऊहून मुंबईला जाण्यासाठी इंडिगोच्या फ्लाइटला दीड तास उशीर करण्यात आला. नियोजित वेळेपेक्षा 1 ते 4 तास उड्डाणाला उशीर झाल्यानं प्रवाशांनी गोंधळ घातला. अचानक उड्डाण रद्द झाल्यामुळे काही प्रवासी चांगलेच नाराज झाले.

हेही वाचा :

  1. एअर इंडियाकडून देण्यात येणाऱ्या जेवणात आढळलं ब्लेड, प्रशासनानं मागितली माफी - Air India Flight
  2. 180 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात, थोडक्यात वाचले प्रवाशांचे प्राण - Pune Aircraft Accident
  3. अचानक विमान कर्मचारी सामूहिक रजेवर! एअर इंडिया एक्सप्रेसची विमान सेवा ठप्प - Air India Express

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.