ETV Bharat / bharat

नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडणार? - INDIA alliance

INDIA alliance : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणूक स्वंबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार देखील इंडिया आघाडीला धक्का देऊ शकतात. याबाबत ETV भारताचे वरिष्ठ पत्रकार अमित अग्निहोत्री यांनी आढावा घेतला आहे.

INDIA alliance
INDIA alliance
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2024, 9:15 PM IST

तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया

पटना INDIA alliance : बिहारचे मुख्यमंत्री तथा JDU अध्यक्ष नितीश कुमार इंडिया आघाडीपासून दूर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयूचे अध्यक्ष झाल्यानंतर नितीश कुमार यांचं पक्षावर पूर्ण नियंत्रण आहे, त्यामुळं ममता बॅनर्जी यांच्या सारखाच ते इडिया आघाडीला धक्का देऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या चर्चेचं उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी खंडन केलंय.

"आम्ही सरकारमध्ये आहोत. ते नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत. मी उपमुख्यमंत्री आहोत. आम्ही नियमितपणे बैठका घेतो. सरकारी कामांबाबत बैठका होतात. मग विरोधकांना काय अडचण आहे. आम्ही ताकदीनं एकत्र काम करत आहोत. तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करा. तुम्ही जे प्रश्न विचारत आहात त्यात कोणतीही वास्तविकता नाही. महाआघाडीत सर्व काही ठीक आहे." -तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री

बॅनर्जींंचा स्वंबळावर निवडणूक लढवणार : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्याच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वंबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यामुळं आता बिहारचे मुख्यमंत्री काय भूमीका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 30 जानेवारीला बिहारच्या पूर्णिया येथे होणारी राहुल यांची प्रस्तावित रॅली विरोधी ऐक्याचं प्रतिक म्हणून पाहिली जात होती. RJD, JD-U तथा डावे पक्ष यांसारख्या सर्व काँग्रेस मित्रपक्षांनी 30 जानेवारीच्या रॅलीला हजेरी लावणे अपेक्षित होतं.

नितीश कुमार इडिया आघाडीतून बाहेर पडणार : तथापि, गुरुवारी नितीश कुमार इडिया आघाडीतून बाहेर पडतील, पूर्णिया रॅलीत ते सहभागी होणार नाहीत, अशी चिंता काँग्रसला होती. यासंदर्भात एका माजी केंद्रीय मंत्र्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, मला आश्चर्य वाटतं की नितीश कुमार अजूनही आमच्यासोबत कसे आहेत?. ते ममता बॅनर्जींच्या मार्गावर जातील, अशी चिंता पक्षात आहे. कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींची जाहीर स्तुती केल्यानं पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे. जर नितीश कुमारांनी इंडिया आघाडी सोडण्याचा निर्णय घेतला, तर नितीश कुमार निश्चितपणे भाजपासोबत निवडणूकपूर्व युती करतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

माहिती घेऊन बोलणार : बिहारमधील चिंतेबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एआयसीसीचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांना परिस्थितीचं पुनर्मूल्यांकन करून माहिती देण्यास सांगितलं आहे. तसंच एआयसीसीचे बिहार प्रभारी सचिव अजय कपूर यांनी सांगितलं की, मी राज्याच्या प्रभारी सरचिटणीसांना भेटणार आहे. त्यानंतरच 'मी' नितीशकुमारांच्या मुद्द्यावर काही बोलू शकेन. पण मला आशा आहे, की नितीश कुमार 30 जानेवारीच्या रॅलीला उपस्थित राहतील.

पूर्णिया रॅली विरोधी एकजुटीचा संदेश : याबाबत बिहार काँग्रेसचे कार्याध्यक्ष कौकब कादरी म्हणाले की, सर्व मित्रपक्षांनी सहभाग घेतल्यास पूर्णिया रॅली नक्कीच विरोधी एकजुटीचा संदेश देईल. सर्व सहकाऱ्यांना निमंत्रणे पाठवली आहेत. रॅलीसाठी आम्ही मेहनत घेत आहोत. काँग्रेसच्या अंतर्गत माहितीनुसार, दिवंगत कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केल्याबद्दल जेडीयू प्रमुखांनी 24 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींचे जाहीरपणे कौतुक करत आभार मानले होते. तेव्हापासून नितीश कुमार यांच्यावर संशय निर्माण झालाय.

नितीश कुमार पर्यायाच्या शोधात?: अलीकडेच, मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्ष लालू यादव यांना सुचवलं होतं, की 2025 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुका लोकसभेच्या निवडणुकांबरोबरच इडिया आघाडीचा प्रभाव वाढवण्यासाठी घ्याव्यात, परंतु आरजेडी प्रमुखांनी हा प्रस्ताव फेटाळला होता. नितीश कुमार जेव्हा भाजपासोबत होते, तेव्हा त्यांना प्रशासनात मोकळे हात होते, पण माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या सरकारमध्ये असलेल्या प्रभावामुळं त्यांना अडथळं येत आहेत. यामुळं नितीश कुमार पर्याय शोधत असतील. एआयसीसीचे माजी सरचिटणीस शकील अहमद म्हणाले की, मला वाटतं, की नितीश कुमार इडिया आघाडीत राहतील. तसंच ते 30 जानेवारीच्या रॅलीत सहभागी होतील.

हे वाचलंत का :

  1. राहुल गांधींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक होणार? आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांनी थेटच सांगितलं
  2. 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिनासाठी का निवडला गेला? का लागू झाली भारतीय राज्यघटना ?
  3. 'राष्ट्रीय मतदार दिवस' 2024 दरवर्षी 25 जानेवारीला का साजरा केला जातो?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.