ETV Bharat / bharat

तुरुंगात अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट; संजय सिंह यांचा भाजपावर गंभीर आरोप - Arvind Kejriwal Health

Sanjay Singh On Kejriwal Health : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी आज (21 जुलै) पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केलेत. भाजपाकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचत असल्याचा दावा त्यांनी केलाय.

AAP Leader Sanjay Singh allegation on BJP in Kejriwal health issue
'आप'चे खासदार संजय सिंह (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 21, 2024, 2:09 PM IST

नवी दिल्ली Sanjay Singh On Kejriwal Health : आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी रविवारी (21 जुलै) पक्ष कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. भाजपाचं केंद्र सरकार आणि दिल्लीचे उपराज्यपाल विनय सक्सेना हे अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात मारण्याचा कट रचत असल्याचा दावा त्यांनी केला. तसंच तुरुंगात अरविंद केजरीवाल यांच्यासोबत कोणतीही अनुचित घटना घडू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

काय म्हणाले संजय सिंह? : " भाजपा आणि दिल्लीचे उपराज्यपाल कारागृह प्रशासनासोबत मिळून षडयंत्र रचत आहेत. उपराज्यपाल कार्यालयातून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आरोग्यासंबंधीचे खोटे वृत्त माध्यमांना दिलं जातंय. हा त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळं या प्रकरणी आम्ही वकिलांशी चर्चा करत आहोत." पुढं संजय सिंह म्हणाले की, "या लोकांनी अगोदर सांगितलं की अरविंद केजरीवाल यांनी मिठाई खाऊन आपली शुगर वाढवली. आता केजरीवाल काही न खाऊन आपली शुगर गरजेपेक्षा जास्त कमी करत असल्याचा आरोप केला जात आहे. पण कोणताही माणूस स्वतःला मारण्याचा प्रयत्न का करेल? भाजपाकडून अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचण्यात येत आहे."

तुरुंग प्रशासन आणि एलजीवर खोटा अहवाल लीक केल्याचा आरोप : पुढे आपचे नेते संजय सिंह म्हणाले," अरविंद केजरीवाल यांच्या आरोग्याशी जाणीवपूर्वक खेळ करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जातोय. खुनाच्या प्रयत्नाचे हे थेट प्रकरण आहे. तसंच या कारणामुळंच कनिष्ठ न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना सीबीआयनं खोट्या प्रकरणात अटक करेपर्यंत तुरुंगात ठेवलंय. जेणेकरून अरविंद केजरीवाल यांच्या आरोग्याशी खेळून त्यांची हत्या केली जाऊ शकते."

अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांबद्दल भाजपाला द्वेष : कावड यात्रेदरम्यान दुकानांवर नावं लिहिण्याच्या आदेशासंदर्भात बोलताना संजय सिंह म्हणाले, "भाजपाची अल्पसंख्याक, दलित आणि वंचितांप्रती दुर्भावना आहे. त्यामुळं कावड यात्रेदरम्यान दुकानांवर नावं लिहिण्याचे आदेश देण्यात आलेत. दलित, अल्पसंख्याक, मागासवर्गीय आदिवासींचे रोजगार बंद करण्याचा हा आदेश आहे. भाजपामध्ये अस्पृश्यता आहे. याचे सर्वात मोठं उदाहरण म्हणजे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना प्रभू श्री राम मंदिराच्या पायाभरणी समारंभाला आमंत्रित करण्यात आलं नव्हत. कारण ते मागासवर्गीय समाजातील आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनादेखील आमंत्रित करण्यात आलं नाही. कारण त्या आदिवासी समाजातील आहेत."

हेही वाचा -

  1. अरविंद केजरीवाल यांचं सीबीआय कारवाईला आव्हान ; आज दिल्ली उच्च न्यायालयात होणार सुनावणी - Delhi Liquor Scam
  2. अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा ; सर्वोच्च न्यायालयानं दिला अंतरिम जामीन - SC Granted Bail To Arvind Kejriwal
  3. दिल्ली दारू घोटाळा प्रकरण : अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक - Arvind Kejriwal Arrest By CBI

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.