ETV Bharat / bharat

गुजरातच्या राजकोट शहरात गेम झोनमध्ये 'अग्नितांडव'; 25 जणांचा होरपळून मृत्यू - Fire in Game Zone Gujarat

Fire in Game Zone Gujarat : गुजरातमधील राजकोटच्या टीआरपी गेम झोनमध्ये भीषण आग लागली. या भीषण आगीत आतापर्यंत 25 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. या घटनेनं देशभरात शोककळा पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय.

गुजरातच्या राजकोट शहरात गेम झोनमध्ये अग्नितांडव
गुजरातच्या राजकोट शहरात गेम झोनमध्ये अग्नितांडव (desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2024, 8:35 PM IST

Updated : May 25, 2024, 10:30 PM IST

गुजरात(राजकोट) Fire in Game Zone Gujarat : राजकोटच्या टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झालाय. शनिवारी (25 मे) सायंकाळी ही भीषण घटना घडली. या घटनेनंतर पोलीस आयुक्त राजू भार्गव आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले. या आगीत 25 जणांना जीव गमवावा लागल्यानं परिसरात घबराटीचं वातावरण आहे.

गुजरातच्या राजकोट शहरात गेम झोनमध्ये 'अग्नितांडव' (EYV Bharat National Desk)

25 जणांचा होरपळून मृत्यू : गुजरातच्या राजकोटमधील नाना मावा रोडवर असलेल्या टीआरपी गेमिंग झोनमध्ये शनिवारी लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झालाय. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची 8 पथकं घटनास्थळी तैनात आहेत. ही आग इतकी भीषण होती की, हळूहळू आगीनं संपूर्ण गेमझोन कॉम्प्लेक्सला वेढलं. अग्निशमन दलानं 10 ते 12 जणांना वाचवलं आहे. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे.

आतापर्यंत 25 मृतदेह काढले बाहेर : राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितलं की, "टीआरपी गेमिंग झोनमध्ये दुपारी आग लागली. बचावकार्य सुरु आहे. आम्ही जास्तीत जास्त मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत सुमारे 25 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, ते रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. गेमिंग झोन युवराज सिंग सोलंकी नावाच्या व्यक्तीच्या मालकीचा आहे. आम्ही झालेल्या मृत्यू प्रकरणी निष्काळजीचा गुन्हा नोंदवू, बचावकार्य पूर्ण केल्यानंतर पुढील तपास केला जाईल."

राष्ट्रपतींकडून दुखः व्यक्त : गुजरातमधील राजकोट येथील गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानं मला खूप दुःख झालंय, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलंय. तसंच लहान मुलांसह ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या कुटुंबांप्रती मी शोक व्यक्त करते. सुटका करण्यात आलेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते, असंही त्यांनी म्हटलंय.

पंतप्रधान काय म्हणाले : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलंय की, "राजकोटमधील आगीच्या घटनेमुळं मी अत्यंत दुःखी आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांप्रती माझ्या संवेदना. जखमींसाठी प्रार्थना. स्थानिक प्रशासन बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत देण्याचं काम करत आहे."

सरकार अलर्ट मोडवर : घटनेचं गांभीर्य पाहून राज्य सरकार अलर्ट झालंय. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलंय की, "राजकोटमधील गेम झोनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेत महापालिका आणि प्रशासनाला तातडीनं बचाव आणि मदतकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्या व्यवस्थेला प्राधान्य देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत." तसंच मुख्य अग्निशमन अधिकारी आय.व्ही. खेर म्हणाले की, "आम्ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहोत, अद्याप कोणी बेपत्ता असल्याची माहिती नाही. जोराचा वारा यामुळं आग विझवण्यात अडचण येत होती."

हेही वाचा :

  1. डोंबिवली एमआयडीसी स्फोटातील मृतांचा आकडा 11 वर; कंपनी मालकाला नाशिकमधून अटक - Dombivli MIDC Blast
  2. भाविकांवर काळाचा घाला; चालती बस पेटल्यानं ८ जणांचा 'कोळसा', होरपळून २४ गंभीर - Fire Caught In Moving Bus In Nuh

Last Updated : May 25, 2024, 10:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.