Accident In West Bengal : पश्चिम बंगालमधील बागडोगरा आणि बांकुरा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात 8 जण ठार तर 14 जण जखमी झाले. अनेक भाविक शिवमंदिरात दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. सकाळी बागडोगरा येथील मुनी टी इस्टेटजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातात 6 यात्रेकरूंचा मृत्यू झाला.
Siliguri, West Bengal: A group returning from Baba Dham lost control and was hit by a car, causing 6 deaths and many injuries. The accident occurred near Bagdogra on National Highway 31. Emergency services responded, and the injured were taken to North Bengal Medical College… pic.twitter.com/8fxHWztdzJ
— IANS (@ians_india) August 12, 2024
उपचारादरम्यान एकाचा मृत्यू : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रल्हाद रॉय (28), गोविंद सिंग (22), अमलेश चौधरी (20), कनक बर्मन (22), प्रणव रॉय आणि पदकांत रॉय (28) अशी मृतांची नावं आहेत. जखमींना उत्तर बंगाल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला.
I share my deepest condolences to the families of Kawadiyas who were struck by a speeding vehicle near Muni T.E, Haskhawa earlier today.
— Raju Bista (@RajuBistaBJP) August 12, 2024
The local administration and police officials are on the spot, and rescue and relief work is being carried out. I am in touch with the… pic.twitter.com/eN0F6P1ror
अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या हरिपाद बर्मन नावाच्या यात्रेकरूनं सांगितलं, "गावातील काही लोकांसह जंगली बाबाच्या मंदिरात पूजा करण्यासाठी जात होतो. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग- 31 वर एका चारचाकी वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मागून येणाऱ्या भाविकांच्या गाडीला धडक दिली. ज्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला."
या घटनेची माहिती मिळताच सिलीगुडी उपविभागीय परिषदेच्या सहाय्यक अध्यक्ष रोमा रेश्मी एक्का घटनास्थळी पोहोचल्या. या अपघाताबद्दल त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं. त्याचवेळी दार्जिलिंगचे खासदार राजू बिस्ता यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय.
बांकुरा येथेही अपघात : पश्चिम बंगालमधील दुसऱ्या एका रस्ते अपघातात बांकुरा जिल्ह्यातील छतना भागात सुसुनिया हिल्सजवळ एका वेगवान ट्रकनं यात्रेकरूंना धडक दिली. यात 2 जण ठार तर 12 जण जखमी झालेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसुनिया डोंगरावरून हातग्राम गावात परतणाऱ्या यात्रेकरूंचा एक गट रस्त्याच्या कडेला विश्रांती घेत असताना तेथून जाणार्या एका ट्रकच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि यात्रेकरूंना धडक दिली. या अपघातातील जखमींना छतना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तेथे उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. तन्मय दत्ता (30) आणि विशाल दत्ता (28) अशी मृतांची नावं आहेत. दोघंही इंदापूरचे रहिवासी होते. अन्य जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचा