ETV Bharat / bharat

रामोजी फिल्म सिटीमध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, पाहा व्हिडिओ - Independence Day Celebration - INDEPENDENCE DAY CELEBRATION

78th Independence Day : हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ईनाडू, ईटीव्ही आणि ईटीव्ही भारतसह रामोजी समूहाच्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.

78th Independence Day Celebrated At Ramoji Film City
'ईनाडू'चे व्यवस्थापकीय संचालक सीएच किरण रामोजी फिल्म सिटी येथे राष्ट्रध्वज फडकवताना (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 15, 2024, 5:35 PM IST

Updated : Aug 15, 2024, 5:44 PM IST

हैदराबाद 78th Independence Day : हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये गुरुवारी 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात पार पडला. 'ईनाडू'चे व्यवस्थापकीय संचालक सीएच किरण यांनी यावेळी ध्वजारोहण केलं. मार्गदर्शीचे व्यवस्थापकीय संचालक शैलजा किरण, आरएफसीच्या व्यवस्थापकीय संचालक विजयेश्वरी, ईटीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बापीनिडू के, रामोजी समूह मानव संसाधनचे (एचआर) अध्यक्ष गोपाल राव, ईनाडू तेलंगणाचे संपादक डीएन प्रसाद, आरएफसीचे संचालक शिवरामकृष्ण, विविध विभागांचे प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

रामोजी फिल्म सिटीमध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा (ETV Bharat)

रामोजी फिल्म सिटी : रामोजी फिल्म सिटी हे सुट्टी घालवणाऱ्यांसाठी स्वप्नवत ठिकाण आहे. 2000 एकरांवर पसरलेलं हे भव्य पर्यटन स्थळ एक प्रकारचे चित्रपट-प्रेरित थीमवर आधारित पर्यटन स्थळ मानलं जातं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं याला जगातील सर्वात मोठे फिल्म सिटी म्हणून मान्यता दिलीय. दरवर्षी सुमारे 200 फिल्म युनिट्स रामोजी फिल्मसिटीमध्ये त्यांची सेल्युलॉइड स्वप्नं साकार करण्यासाठी येतात. या ठिकाणी जवळपास भारतीय भाषांमधील 2500 हून अधिक चित्रपटांचं चित्रीकरण झालंय.

  • दरम्यान, आज देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित केलं.

78 वा स्वातंत्र्यदिन : स्वातंत्र्य दिन हा भारताचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं. यंदा संपूर्ण देश 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. आपला ध्वज हे राष्ट्राभिमानाचं प्रतिक आहे. स्वातंत्र्यदिनी ठिकठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात येतो. देशाचा राष्ट्रध्वज 'तिरंगा' म्हणून ओळखला जातो. हा भगवा, पांढरा आणि हिरवा या तीन रंगांचा असतो. यात पांढर्‍या पट्ट्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. या अशोक चक्रात 24 आरे आहेत.

हेही वाचा -

  1. मुख्यमंत्री ध्वजारोहण करताना उडाला गोंधळ; दोरी गठ्ठ बांधल्यानं उघडला नाही ध्वज अन्.... पाहा व्हिडिओ - CM Eknath Shinde Flag Hoisting
  2. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यास सक्षम; लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एल्गार - Independence Day 2024
  3. गणवेशाविना विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा; मंत्री म्हणतात, महिना अखेर गणवेश मिळणार - School Uniform

Last Updated : Aug 15, 2024, 5:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.