चंदीगड Haryana Workers Leave For Israel : हरियाणातून 530 तरुणांचा पहिला गट इस्रायलमध्ये नोकरीसाठी रवाना झालाय. तत्पूर्वी, राज्याचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी युवकांशी फोनवर संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. याशिवाय माजी मुख्यमंत्री मनोहर लाल यांनीही इस्रायलला जाणाऱ्या तरुणांशीही चर्चा केली. सर्व तरुणांनी या सहकार्याबद्दल राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
1.37 लाख रुपये पगार मिळणार : इस्रायलला गेलेल्या बहुतांश तरुणांना 1.37 लाख रुपये पगार मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील यशानंतर राज्य सरकार आता दुसऱ्या टप्प्यात तरुणांना रोजगार देण्यासाठी पुन्हा रिक्त पदं जारी करणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ही पदं जाहीर केली जाऊ शकतात, असं मानलं जातंय. जानेवारी 2024 मध्ये भारतातील तरुणांकडून 7 देशांमध्ये 13294 पदांसाठी मागणी करण्यात आली होती. त्यासाठी पद, पात्रता आणि वेतनही जाहीर करण्यात आलं होतं.
1370 उमेदवारांपैकी केवळ 530 जणांना इस्रायलला पाठवलं : इस्रायलमध्ये 10 हजार कामगारांच्या भरतीसाठी 1370 उमेदवारांनी अर्ज केलं होतं. पण यापैकी फक्त 530 इस्रायलला पाठवण्यात आलं. 'इस्रायल बिल्डर्स असोसिएशन'तर्फे सर्व तरुणांसाठी तिकिटांची व्यवस्था करण्यात आलीय. हरियाणात रोहतकमध्ये 16 ते 20 जानेवारी दरम्यान ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती.
ओव्हरटाईचे पैसेही मिळणार : इस्रायलमध्ये 10 हजार बांधकाम कामगारांची मागणी करण्यात आलीय. फ्रेमवर्क, शटरिंग, सुतार, प्लास्टरिंग, सिरॅमिक टाइलसह इतर प्रकारची कामं करणाऱ्या लोकांची गरज आहे. या कामासाठी तुम्हाला दरमहा 1 लाख 37 हजार रुपये पगार मिळेल. तुम्हाला ओव्हरटाईम देखील मिळेल. यासाठी पात्रता 10वी पास, तीन वर्षांचा अनुभव, वय 25 ते 45 वर्षे आहे. याशिवाय वैद्यकीय विमा, भोजन आणि निवासाचीही सोय आहे. उमेदवारांना दरमहा 16515 रुपये बोनस दिला जाणार आहे.
इस्रायलमध्ये मागणी का आहे? : इस्रायल-हमास युद्धानंतर, इस्रायलमधील मोठ्या संख्येनं पॅलेस्टिनींच्या कामाचे परवाने रद्द करण्यात आले. इस्रायलचा उत्पादन उद्योग रिक्त पदे भरण्यासाठी भारतासह इतर देशांतून कर्मचारी शोधत आहे. त्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज आहे. हे पाहता हरियाणा सरकारनंही राज्यातील तरुणांना पाठवण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा :