ETV Bharat / bharat

छत्तीसगडमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या; घटनेनंतर आरोपीनंही केली आत्महत्या - Killing Five People in Sarangarh - KILLING FIVE PEOPLE IN SARANGARH

Murder in Chhattisgarh : छत्तीसगडच्या बालोदाबाजारला लागून असलेल्या सारंगडमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करुन आरोपीनंही आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे.

छत्तीसगडमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या; घटनेनंतर आरोपीनं केली आत्महत्या
छत्तीसगडमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या; घटनेनंतर आरोपीनं केली आत्महत्या (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 4:29 PM IST

सारंगड (छत्तासगड) Murder in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये बालोदा बाजारालगत असलेल्या सारंगडमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या झाल्याची घटना समोर आलीय. यातील मृतांमध्ये तीन महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. या हत्येची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे. या घटनेतील मारेकऱ्यानंही आत्महत्या केलीय. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण : हे संपूर्ण प्रकरण सारंगडच्या सलीहा पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. येथील थरगाव इथं एकाच कुटुंबातील पाच जणांवर हातोडा आणि चाकूनं वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. यातील मारेकरी हा मृताचा शेजारी असल्याचं सांगण्यात येत असून, त्यानंही हत्येनंतर आत्महत्या केली. सध्या या हत्येचं कारण समजू शकलेलं नाही. मात्र या घटनेनंतर गावात भीतीचं वातावरण आहे. गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

ही घटना सारंगड बिलाईगड जिल्ह्यातील आहे. सध्या पोलीस तपास करत आहेत. - अविनाश ठाकूर, एएसपी, बालोदा बाजार भाटापारा

पोलीस तपासात सुरू : या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. तसंच पोलीस पुढील कारवाई करत आहेत. या हत्येनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे. थारगाव हे बालोदा बाजार, महासमुंद आणि सारंगड-बिलाईगड जिल्ह्यांचं सीमावर्ती क्षेत्र आहे. थारगाव हे महासमुंद जिल्हा मुख्यालयापासून 22 किलोमीटर अंतरावर सलीहा पोलीस स्टेशन परिसरात आहे. हा परिसर सारंगड बिलाईगडमध्ये येतो. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात घबराटीचं वातावरण आहे.

हेही वाचा :

  1. इन्स्टाग्रामवर 'गे' म्हणल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण, मोडले नाकाचे हाड - BEATING FRIEND ON INSTAGRAM comment
  2. कोपर्डीत मागासवर्गीय तरुणाची आत्महत्या; विवस्त्र करून मारहाणीनंतर उचललं टोकाचं पाऊल - Kopardi Crime
  3. चोरट्यांचा पाठलाग करणं ठरलं जीवघेणा; मोबाईल घेण्यासाठी गुन्हेगाराच्या मागे धावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू - Mumbai Crime News
  4. बारा दिवसांपूर्वी सापडलेल्या मृतदेहाचा झाला उलगडा, पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीनं हत्या केल्याचं उघड - Amravati Crime

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.