नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील चार शाळांना बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. या शाळांना बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी ईमेल करुन देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांमध्ये पुन्हा दहशत पसरली आहे. या धमक्यांमुळे पालकांनी आपल्या चिमुकल्यांना शाळेत पाठवण्याबाबत मोठी चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या अगोदरही दिल्लीतील शाळांना बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी देण्यात आली.
4 schools in Delhi received bomb threat emails today. Fire officals and police on the spot. Nothing suspicious found yet: Delhi Police
— ANI (@ANI) December 13, 2024
बॉम्बस्फोटाची धमकी दिल्यानं पोलीस घटनास्थळी : अज्ञात माथेफिरुनं ईमेल करुन ही धमकी दिल्यानं प्रशासनानं तत्काळ याबाबत पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत तपासणी सुरू केली असून घटनास्थळावर काहीही संशयास्पद आढळलं नाही. त्यामुळे या अगोदरसारखाच हा सुद्धा फेक कॉल असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र पोलीस खबरदारीचा उपाय घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या अगोदरही दोन शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी : दिल्लीतील दोन शाळांना या अगोदर बॉम्बस्फोटानं उडवण्याची धमकी देण्यात आली. अज्ञात माथेफिरुनं ईमेल करुन ही धमकी दिली. राजधानीतील दिल्ली पब्लिक स्कूल आणि जीडी गोएंका पब्लिक स्कूलला बॉम्बस्फोटानं उडवण्याची धमकी देण्यात आली. याबाबत दिल्ली पोलिसांनी, "दिल्लीतील दोन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली. शाळा प्रशासनानं विद्यार्थ्यांना घरी पाठवलं आहे. अग्निशमन दल विभाग आणि पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली." विशेष म्हणजे दिल्लीतील सीआरपीएफच्या शाळेत या अगोदर स्फोट झाल्यानं पालकांमध्ये मोठी दहशत पसरली. त्यानंतर सतत दिल्लीतील शाळांना धमकीचे इमेल येत असल्यानं पालक धास्तावले आहेत.
हेही वाचा :