ETV Bharat / bharat

तीन फूटाची वधू तर पाच फूटाचा वर ; एका अनोख्या लग्नाची 'दुसरी' गोष्ट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 1:25 PM IST

3 Feet Bride 5 Feet Groom : जबलपूरमध्ये पार पडलेल्या एका अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एकी तीन फुटाच्या वधूसोबत पाच फुटाच्या वरानं लग्न केलं. सामाजिक कार्यकर्त्यांनी या अनोख्या विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं.

3 Feet Bride 5 Feet Groom
तीन फूटाची वधू
तीन फूटाची वधू तर पाच फूटाचा वर

भोपाळ 3 Feet Bride 5 Feet Groom : सध्या जबलपूरमध्ये एका अनोख्या लग्नाची मोठी चर्चा सुरू आहे. त्याचं कारणही तसंच आहे. जबलपूरमधील एका तीन फूट वधूसोबत एका पाच फूटाच्या वराचं लग्न लागलं आहे. प्रभात असं या लग्नातील वराचं नाव आहे. तर संध्या असं वधूचं नाव आहे. संध्याची उंची केवळ तीन फूट आहे. या लग्नामुळं संध्या आणि प्रभात चांगलेच खूश आहेत. मात्र या लग्नात संध्याचं कुटुंबीय सहभागी झालं नाही. दुसरीकडं सामाजिक कार्यकर्त्यांनी या लग्नात संध्याच्या पालकांची भूमिका बजावत कन्यादान केलं आहे.

3 Feet Bride 5 Feet Groom
तीन फूटाची वधू तर पाच फूटाचा वर

संध्या आणि प्रभातची मैत्री पोहोचली लग्नापर्यंत : संध्या ही रिवा इथली राहणारी आहे. मात्र मागील काही वर्षांपासून ती जबलपूरमधील खामरिया परिसरात राहत होती. सध्या संध्याचं वय 21 वर्ष असून लहानपणीचं तिची उंची खुंटली आहे. साधारणत: कमी उंची असलेले नागरिक त्यांच्या सारख्याचं उंचीच्या जोडीदारांसोबत लग्न करतात. मात्र संध्या तीन फूट उंचीची असूनही प्रभातनं तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रभात आणि संध्या हे दोघं अगोदर चांगले मित्र झालं. त्यानंतर त्यांची मैत्री लग्नापर्यंत पोहोचली.

सामाजिक कार्यकर्त्यांनी लावलं संध्या प्रभातचं लग्न : जबलपूर इथल्या हनुमानताल शिव मंदिरात हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. या अनोख्या लग्नात अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्या रिना सिंह यांनी हा विवाह सोहळा आयोजित केला होता. रिना सिंह यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, "संध्या आणि प्रभातचं हे अनोखा नोंदणी विवाह सोहळा करण्यात आला आहे. संध्याला भविष्यात कोणताच त्रास होऊ नये, म्हणून हा नोंदणी विवाह करण्यात आला आहे."

संध्या टीव्ही नृत्य स्पर्धेची विजेता कलावंत : सामाजिक कार्यकर्त्या रिना सिंह यावेळी बोलताना म्हणाल्या की, "संध्या खूप चांगली कलावंत आहे. तिनं 16 वर्षांपूर्वी टीव्हीवरील शोमध्ये भाग घेऊन ती स्पर्धा जिंकली होती. मात्र तिची कला या गर्दीत कुठंतरी लपून राहिली. संध्या आमच्यासोबत मेकअप शिकत आहे. तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. प्रभात आणि संध्या यांनी त्यांच्या इच्छेनं लग्न केलं. यावेळी प्रभातनं दाखवलेलं धाडस वाखाणण्याजोगं आहे."

हेही वाचा :

  1. विशेष विवाह कायद्यातून मुस्लिमांना वगळा, मेहेर बंद होणार असल्यानं महिलांचे आंदोलन
  2. अनंत अंबानी, राधिका मर्चंट यांनी लग्न विधी सुरू होण्यापूर्वी केली 'अन्न सेवा'
  3. शिर्डीत या आणि सव्वा रुपयात लग्न लावा, २ मे रोजी पार पडणार सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.