शारजाह (युएई) Afghanistan vs South Africa 3rd ODI Live Streaming : अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ यांच्यात प्रथमच वनडे फॉरमॅटमध्ये तीन सामन्यांची द्विपक्षीय मालिका खेळवली जात आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघानं आपल्या खेळानं सर्वांना चकित केलं आणि पहिल्या दोन्ही वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केला. यासह त्यांनी तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 नं खिशात घातली आहे. आज या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना होणार आहे.
𝐅𝐈𝐕𝐄 𝐟𝐨𝐫 𝐑𝐚𝐬𝐡𝐢𝐝 𝐊𝐡𝐚𝐧! 🖐️
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 20, 2024
Rashid Khan steps up yet again and picks up his 5th wicket in the game. 🤩
Terrific bowling, Rash! 👏#AfghanAtalan | #AFGvSA | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/1TRzg1bj79
अफगाणिस्ताननं रचला इतिहास : दोन्ही संघांमधील दुसरा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. मात्र या सामन्यात अफगाणिस्तान संघानं दक्षिण आफ्रिकेवर 177 धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिका जिंकून आणखी एक मोठा अपसेट निर्माण केला. विशेष म्हणजे आतापर्यंत अफगाणिस्ताननं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकही मालिका जिंकलेली नव्हती. मात्र आता त्यांनी ही मालिका जिंकत त्यांनी इतिहास रचला आहे. आता अफगाणिस्तानला मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेचा क्लीन स्वीप करायचा आहे. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मागील दोन्ही पराभव विसरुन या सामन्यात पुनरागमन करुन प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळं हा सामना कुठं बघता येईल, याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
𝐀𝐅𝐆𝐇𝐀𝐍𝐈𝐒𝐓𝐀𝐍 𝐖𝐈𝐍! 🙌#AfghanAtalan have put on a remarkable all-round performance to beat South Africa by 177 runs in the 2nd ODI and take an unassailable 2-0 lead in the series. 👏
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 20, 2024
Congratulations on the historical achievements, Atalano! 🤩
#AFGvSA pic.twitter.com/YEFo1ouinK
- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना कधी खेळला जाईल?
अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना रविवार, 22 सप्टेंबर रोजी होणार आहे.
- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना कुठं खेळवला जाईल?
अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह इथं होणार आहे.
- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना किती वाजता सुरु होईल?
अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5.30 वाजता सुरु होईल.
- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना टीव्हीवर कसा पाहायचा?
अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना भारतात टीव्हीवर दिसणार नाही.
- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?
अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही फॅनकोड ॲपवर पाहू शकाल.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
- अफगाणिस्तान : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमत शाह (उपकर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इक्रम अली खिल, अब्दुल मलिक, रियाझ हसन, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नईब, रशीद खान, नांग्याल खरोती, अल्लाह मोहम्मद गज, फजलहक फारुकी, बिलाल सामी, नवीद झादरन आणि फरीद अहमद मलिक.
- दक्षिण आफ्रिका : टेम्बा बवुमा (कर्णधार), ओटनील बार्टमन, नांद्रे बर्जर, टोनी डीजॉर्ज, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, एंडिले फेहलुक्वायो, नकाबा पीटर, एंडिले सिमेलेन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेनी आणि लिजार्ड विलियम्स.
हेही वाचा :