ETV Bharat / bharat

शेतकरी आंदोलनाचा 27वा दिवस: आंदोलक रेल्वेनं दिल्लीला पोहोचण्याची शक्यता, पंजाबमध्ये 'रेल रोको'ची हाक

27th Day Of Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 27वा दिवस आहे. आंदोलक शेतकरी रविवारी गाड्यांमधून दिल्लीत पोहोचू शकतील, या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पंजाबमध्येही रेल रोको आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

शेतकरी आंदोलनाचा 27वा दिवस: आंदोलक शेतकरी रेल्वेनं पोहोचू शकतात दिल्लीला, पंजाबमध्ये 'रेल रोको'ची हाक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 9:45 AM IST

नवी दिल्ली 27th Day Of Farmers Protest : किमान आधारभूत किंमत (एसपी) आणि इतर मागण्यांसाठी केंद्र सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आदोलनाचा 27वा दिवस आहे. आज शेतकरी दिल्लीच्या दिशेनं मोर्चा काढणार आहेत. शेतकरी संघटनांनी रविवारी पंजाबमध्ये रेल रोको आंदोलनाची हाक दिलीय. त्याचवेळी शेतकरी रेल्वेनं दिल्लीला पोहोचू शकतात, अशी माहिती पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना मिळालीय. अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आलीय. तसंच सुरक्षा यंत्रणेचे अधिकारीही सतर्क झाले आहेत.

शेतकऱ्यांचा दिल्लीत जाण्याचा प्रयत्न : पंजाबमधून दिल्लीत येण्यासाठी शेतकरी महिनाभरापासून प्रयत्न करत आहेत. या शेतकऱ्यांना हरियाणाच्या शंभू सीमेवर थांबवण्यात आलंय. त्यामुळं ते दिल्लीला येऊ शकले नाहीत. यानंतर त्यांनी फेब्रुवारीमध्ये दिल्लीला येण्याची योजनाही आखली. परंतु, तरीही ते राजधानीत येऊ शकले नाहीत. यानंतर शेतकऱ्यांनी 10 मार्चला दिल्लीत येण्याची घोषणा केली होती. त्यामुळं रविवारी मोठ्या संख्येनं शेतकरी दिल्लीत येण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळं दिल्लीच्या सीमेवर आणि रेल्वे स्थानकांवरही सुरक्षा वाढवण्यात आलीय.

रेल्वेनं शेतकरी दिल्लीला येण्याची शक्यता : रेल्वेच्या सूत्रांनुसार, शेतकरी वेगवेगळ्या गटांमध्ये ट्रेनमध्ये चढू शकतात. नवी दिल्ली, जुनी दिल्ली, हजरत निजामुद्दीन, सराय रोहिल्ला यासह इतर रेल्वे स्थानकांवर पोहोचू शकतात. जर शेतकरी दिल्लीत आले नाहीत तर ते पंजाबच्या काही भागात ट्रेन थांबवू शकतात. यामुळं रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दिल्लीच्या सर्व रेल्वे स्थानकांवर आरपीएफ आणि जीआरपीच्या जवानांसह इतर दलाचे जवानही सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

दिल्लीत कलम 144 लागू : याशिवाय पंजाब, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू येथून येणाऱ्या गाड्यांवरही रेल्वे स्थानकांवर नजर ठेवण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकावर आल्यानंतर कोणताही गट आंदोलन करताना दिसल्यास पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतील. दिल्लीत पोलिसांनी कलम 144 लागू केलंय. अशा परिस्थितीत एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र येण्यास किंवा निदर्शनं करण्यास बंदी घालण्यात आलीय, असं करणाऱ्यांना पोलीस कलम 144 अंतर्गत अटक करू शकतात.

हेही वाचा :

  1. शेतकऱ्यांचा मागं न हटण्याचा निर्धार; 'या' तारखेला करणार दिल्लीकडं कूचन
  2. शेतकरी आंदोलकांच्या हल्ल्यात 12 जवान जखमी, एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.