ETV Bharat / bharat

तब्बल 25 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण; नक्षलवाद्यांच्या अत्याचारांमुळे सुरक्षा दलापुढं टाकली शस्त्र खाली - 25 Naxalites Surrender

25 Naxalites Surrender : बस्तरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना मोठं यश आलं आहे. सुरक्षा दलाच्या जवानांपुढं तब्बल 25 कुख्यात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.

25 Naxalites Surrender
प्रतिकात्मक छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2024, 7:09 PM IST

तब्बल 25 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण (ETV Bharat)

रायपूर 25 Naxalites Surrender : बस्तरमध्ये सुरक्षा दलांद्वारे चालवण्यात येत असलेल्या ऑपरेशनला मोठं यश आलं आहे. सुरक्षा दलाकडून चालवण्यात येत असलेल्या नियद नेल्लानार या ऑपरेशनचा मोठा प्रभाव नक्षलवाद्यांवर पडला आहे. योजनेमुळे प्रभावित होऊन 25 नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. विजापूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात या 25 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. या आत्मसमर्पण केलेल्या 3 नक्षलवाद्यांवर सरकारनं मोठा इनामही घोषित केला होता.

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना बक्षीस : आत्मसमर्पण केलेल्या 25 नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांकडून बक्षीस देण्यात आलं आहे. यामध्ये नक्षलवाद्यांच्या प्लाटून क्रमांक 2 चे तीन सदस्य, डेप्युटी कमांडर, एलओएस सदस्य आणि सीएनएएम सदस्य (चेतना नाट्य मंच) यांचा समावेश आहे. हे नक्षलवादी भैरमगड आणि गांगलूर एरिया कमिटीशी संबंधित आहेत. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांपैकी तीन नक्षलवाद्यांवर आठ लाख रुपयांचं बक्षीस सरकारनं जाहीर केलं होतं.

आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांवर आठ लाखाचं बक्षीस : आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये शामबती मडकम हिचा समावेश आहे. सरकारनं शामबती मडकम हिच्यावर आठ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. शामबती मडकम हिच्याशिवाय ज्योती पूनेमनंही आत्मसमर्पण केलं आहे. त्याच्यावर आठ लाखांचं बक्षीस होतं. नक्षलवादी महेश तेलम यानंही आत्मसमर्पण केलं आहे. महेश तेलम याच्यावर आठ लाखांचं बक्षीस होतं.

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची मोठी गुन्हेगारी कुंडली : आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढं आपली शस्त्रं टाकली. मात्र त्यांची मोठी गुन्हेगारी कुंडली असल्याचं पुढं आलं आहे. शामबती मडकम ही कुख्यात नक्षलवादी मानली जाते. मिनपा आणि टेकलगुडम नक्षलवादी चकमकीत तिचा सहभाग होता. मिनपा इथं 17 जवान हुतात्मा झाले, तर टेकलगुडेममध्ये 21 जवानांना वीरमरण आलं. नक्षलवादी ज्योती पूनमवर गोळीबार, रास्ता रोको आणि अनेक नक्षलवादी कारवायांचा आरोप आहे. नक्षलवादी महेश तेलम याच्यावर रस्ता रोको, सुरक्षा दलांशी चकमक, आयईडी स्फोट यांसारख्या घटना घडवल्याचा आरोप आहे.

नक्षलवाद्यांच्या अत्याचारामुळे आत्मसमर्पण : नक्षलवाद्यांनी अनेक कारवायात सहभाग घेतला असल्याचं उघड झालं. मात्र दलममध्ये झालेल्या अत्याचारामुळे आत्मसमर्पण करणार असल्याचं नक्षलवाद्यांनी सांगितलं आहे. आत्मसमर्पण केलेल्या सर्व नक्षलवाद्यांना सरकारच्या नक्षल पुनर्वसन धोरणांतर्गत प्रत्येकी 25 हजार रुपयांची प्राथमिक आर्थिक मदत देण्यात आली आहे.

या नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण :

  • विष्णु करटम ऊर्फ मीनू
  • जयदेव पोडियाम
  • गुडडु ककेम
  • सुदरू पूनेम
  • सन्नू पोड़ियाम
  • बासू पोड़ियाम
  • मोटूराम तेलम
  • सोमारू तेलम
  • सोमलू पोटाम
  • राजू वंजाम
  • सुखराम तेलम
  • आयतु तेलम
  • संतोष तेलम
  • बिज्जू तेलम
  • राकेश फरसीक
  • बुदरू पूनेम
  • कोया पूनेम
  • सांतो पूनेम
  • छोटू पूनेम
  • सुक्कू कुडियम
  • पाकलू पूनेम
  • मेश अवलम

हेही वाचा :

  1. सात चकमकी, दोन जणांचा खून; छत्तीसगड, ओडिशात कारवाया करणाऱ्या जहाल नक्षलवादी महिलेचं आत्मसमर्पण - Naxal Woman Surrender In Gadchiroli
  2. गडचिरोलीत 2000 पासून 299 नक्षलवादी ठार, आजपर्यंत किती मोहिमा यशस्वी ठरल्या आहेत? - gadchiroli naxal attacks
  3. घनदाट जंगलातील नक्षली मोहीम फत्ते करुन C-60 कमांडो परतले - 12 Naxalites killed

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.