नवी दिल्ली Sabarmati Express Derail : साबरमती एक्सप्रेस रेल्वे दगडावर धडकल्यानंतर रुळावरुन घसरल्यानं मोठी खळबळ उडाली. साबरमती एक्सप्रेस तब्बल 20 डबे शनिवारी पहाटे 2:30 वाजता उत्तर प्रदेशातील कानपूर आणि भीमसेन स्थानकादरम्यान रुळावरून घसरले आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दगडावर आदळून रेल्वे रुळावरुन घसरल्याची माहिती रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यानं दिली. साबरमती एक्सप्रेस रुळावरुन घसरल्यानं या रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांची मात्र मोठी तारांबळ उडाली.
#WATCH | Kanpur, Uttar Pradesh | ADM city, Rakesh Verma reaches the site where Sabarmati Express derailed. pic.twitter.com/nPY3xSs9QL
— ANI (@ANI) August 17, 2024
दगडावर आदळून साबरमती एक्सप्रेसचा झाला अपघात : साबरमती एक्सप्रेस ही रेल्वे गाडी कानपूर आणि भीमसेन या दरम्यान शनिवारी पहाटे अडीच वाजता जात होती. यावेळी दगडाला आदळून साबरमती एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरले आहेत, अशी माहिती लोको पायलटनं दिली. "दगडाला रेल्वेचा पुढील भाग आदळल्यानं तो वाकला आहे. इंजिनचा पुढील बाग खराब झाला. त्यामुळे साबरमती एक्सप्रेसचे 20 डबे रुळावरुन खाली घसरले आहेत, मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही," अशी माहिती लोको पायलटनं दिली.
Uttar Pradesh | Train number 19168, Sabarmati Express derailed in a block section between Kanpur and Bhimsen station. No injuries to anyone were reported from the site. Buses have reached the site to take the passengers to Kanpur: Indian Railways
— ANI (@ANI) August 17, 2024
(Source - Indian Railways) pic.twitter.com/vYGmTgDthv
रेल्वे रुळावरुन घसरल्यानं सात गाड्या रद्द : साबरमती एक्सप्रेस रेल्वे गाडी रुळावरुन घसरल्यानं कानपूरमध्ये मोठी खळबळ उडाली. दगडाला धडकून रेल्वेचे 20 डबे रुळावरुन घसरले आहेत. "प्राथमिक तपाणीनुसार रेल्वेच्या ट्रॅकमध्ये कोणतंही फ्रॅक्चर नाही. गुप्तचर विभाग आणि रेल्वे पोलिसांसह उत्तरप्रदेशातील पोलीस घटनेचा तपास करत आहेत. प्रवाशांना किंवा कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. कानपूर इथून अहमदाबादच्या पुढील प्रवासासाठी ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे," असं भारतीय रेल्वेनं एका निवेदनात नमूद केलं आहे. साबरमती एक्सप्रेस रेल्वे रुळावरुन घसरल्यानं सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर तीन गाड्या वळवण्यात आल्या आहेत. अपघातस्थळावरून प्रवाशांना कानपूर रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली, अशी माहिती उत्तर मध्य रेल्वे विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO ) शशिकांत त्रिपाठी यांनी दिली. "प्रवाशांना परत कानपूरला नेण्यासाठी आठ डब्यांची मेमू ट्रेन कानपूरहून अपघातस्थळी रवाना झाली. प्रवाशांना त्यांच्या नियोजितस्थळी पाठवण्याची पुढील व्यवस्था करण्यात आली आहे," असंही त्रिपाठी यावेळी म्हणाले.
रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक केले जारी : प्रयागराज : 0532-2408128, 0532-2407353, कानपूर : 0512-2323018, 0512-2323015, मिर्झापूर : 054422200097, T2957, T2970 959702, अहमदाबाद : 07922113977, बनारस शहर : 8303994411 , गोरखपूर : ०५५१-२२०८०८८. याशिवाय, झाशी रेल्वे विभागासाठी खालील हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले.: विरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन) -0510-2440787 आणि 0510-2440790. ओराई -05162-252206, बांदा-05192-227543, ललितपूर जंक्शन - 07897992404.
हेही वाचा :
- हावडा सीएसएमटी एक्सप्रेस अपघातग्रस्तांना 50 हजारांची मदत, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल - Howrah Mumbai Train Accident
- चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेस रुळावरून घसरल्यानं डबे उलटले, चार प्रवाशांचा मृत्यू - Chandigarh Dibrugarh Train Derailed
- अश्विनी वैष्णव यांच्या कार्यकाळात 131 रेल्वे अपघात, प्रभावी उपाययोजना करण्याची प्रवासी संघटनेची मागणी - TRAIN ACCIDENTS RTI