अजमेर Abdul Karim Tunda : 1993 साली देशात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी टाडा न्यायालयानं आज झालेल्या सुनावणीत कोर्टानं अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात अब्दुल करीम टुंडा मुख्य आरोपी होता. या प्रकणाचा निकाल अजमेरच्या टाडा कोर्टानं 23 फेब्रुवारीला राखून ठेवला होता.
देशात साखळी बॉम्बस्फोट : 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयानं अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता केली असून इरफान तसंच हमीदुद्दीन या दोन आरोपींना शिक्षा सुनावली आहे. 6 डिसेंबर 1993 रोजी अयोध्येतील बाबरी ढाचा पाडल्यानंतर कोटा, लखनौ, हैदराबाद, सुरत, कानपूर, मुंबईच्या गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले होते. या प्रकरणात टुंडा हा मुख्य आरोपी होता. सीबीआयनंही टुंडाला या स्फोटांचा मास्टरमाईंड मानलं होत. टुंडाला 2013 मध्ये नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली होती.
सीबीआय जाणार उच्च न्यायालयात : देशातील 5 मोठ्या शहरात 6 डिसेंबर 1993 ला बॉम्बस्फोट झाले होते. यात लखनौ, कानपूर, हैदराबाद, सुरत आणि मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. अजमेरच्या टाडा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या कालावधीत 570 साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले. दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या युक्तीवादानंतर टाडा न्यायालयानं टुंडाची निर्दोष मुक्तता केली आहे. त्याचवेळी सीबीआय सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची शक्यता आहे.
हमीनुद्दीन तसंच इरफानला जन्मठेपेची शिक्षा : अब्दुल करीम टुंडावर 33 गुन्हे दाखल आहेत. यापैकी टुंडाची 29 प्रकरणांत निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र, टुंडाला सोनीपत न्यायालयानं साखळी बॉम्बस्फोट प्रकणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. टाडा न्यायालयानं निर्दोष मुक्त केल्यानंतर सीबीआय टुंडाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकतं. तसंच या प्रकरणात हमीनुद्दीन तसंच इरफान या दोघांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे.
हे वाचलंत का :