नवी दिल्ली Delhi Coaching Center incident : राजधानीतील राजेंद्र नगर परिसरात कोचिंग सेंटरच्या तळमजल्यात पाणी भरल्यानं तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरएयूच्या आयएएस स्टडी सर्कल कोचिंग मालकासह दोन आरोपींना दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्ली पोलिसांनी दोन्ही आरोपींना रात्री उशिरा न्यायाधीशांसमोर हजर केलं. त्यानंतर कोचिंग सेंटर विद्यार्थी मृत्यू प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कोचिंग मालक अभिषेक गुप्ता आणि समन्वयक देशपाल सिंग असं न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलेल्या आरोपींती नावं आहेत.
कोचिंग मालक आणि समन्वयकाला न्यायालयीन कोठडी : राजेंद्र नगर परिसरातील कोचिंग सेंट्रमध्ये पाणी शिरल्यानं तीन विद्यार्थ्यांचा बळी गेला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कोचिंग मालक अभिषेक गुप्ता आणि समन्वयक देशपाल सिंग यांना बेड्या ठोकल्या होत्या. या दोघांनाही दिल्लीतील 30 हजारी न्यायालयात रात्री उशिरा न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयानं या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली. दिल्ली पोलिसांनी कोचिंग मालक अभिषेक गुप्ता आणि समन्वयक देशपाल सिंग यांना 28 जुलैला अटक केली. या दोघांशिवाय पोलिसांनी इमारत व्यवस्थापन, यंत्रणा सांभाळणारे कर्मचारी आणि अन्य आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तळघरात होतं ग्रंथालय : कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरल्यानं तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हे विद्यार्थी तळघरातील वाचनालयात अभ्यास करत होते. हे ग्रंथालय आरएयूच्या आयएएस स्टडी सर्कलच्या तळघरात असल्यानं यूपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी या वाचनालयात अभ्यास करत होते. या तळघरात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा तळघरात पाणी भरल्यानं मृत्यू झाला. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली. तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका राष्ट्रीय प्रवासी मंचनं उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेत कोचिंग सेंटरमध्ये तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. तसंच या पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
हेही वाचा :