Accident CCTV Video : पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात; चार पलट्या खाऊनही सर्व जण बचावले - चार पलट्या खाऊनही सर्व जण बचावले
🎬 Watch Now: Feature Video
पिंपरी-चिंचवड - पुणे-मुंबई महामार्गावर आई एकविराचे दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने परताना कारचा अपघात झाला आहे. दैव बलवत्तर असल्याने यात सहा प्रवासी बचावले आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली ( Pimpri Accident CCTV Video ) असून खंडाळा येथील वळणावर घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आई एकविराचे दर्शन घेऊन निघालेल्या कारचा खंडाळा वळणावर अपघात झाला. ही घटना आज सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडली असून कार चार वेळेस पलटी ( car overturned four times ) झाली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, खंडाळा वळणावर असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अद्याप अपघात झालेल्या व्यक्तींची नावे समजू शकली नाहीत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST