Video : जालन्यात कलिंगडाचा ट्रक पलटी; लोकांनी पळवले कलिंगड - जालना ट्रक अपघात
🎬 Watch Now: Feature Video
जालना - जालन्यातील औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर कलिंगडाची वाहतूक करणारा एक ट्रक उलटला. त्यांनंतर उलटलेला ट्रक थेट रस्त्याच्या खाली जाऊन कोसळला. अंबड तालुक्यातील डोमेगाव फाट्यावर ही घटना घडली. हा ट्रक उलटल्यानंतर त्यातील कलिंगड जमिनीवर पडलेली दिसताच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह आजूबाजूच्या नागरिकांनी ट्रक चालकाला मदत करण्याऐवजी थेट ट्रक मधील तसेच बाहेर पडलेली सर्व कलिंगडं लुटून नेली. विशेष म्हणजे हे कलिंगड लुटण्यासाठी आजूबाजूचे नागरिक आणि प्रवाशांनी चांगलीच गर्दी केली होती. काहींनी तर थेट गोण्या भरून नेऊन ही कलिंगडं लुटून नेली. त्यामुळे ट्रक चालकाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST