Video : महिला पोलिसांचा ढोल- ताशाच्या गजरावर भन्नाट डान्स.. - Moradabad Home Guard Retirement

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 1, 2022, 9:43 AM IST

मुरादाबाद ( उत्तरप्रदेश ) : निवृत्तीनंतर कोणत्याही सरकारी विभागातील कर्मचाऱ्याला विभागाकडून निरोप दिला जातो. मात्र मुरादाबादमध्ये दोन महिला होमगार्डना ज्या पद्धतीने निवृत्तीचा निरोप देण्यात ( Moradabad Home Guard Retirement ) आला, तो जल्लोष पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले. होमगार्ड विभागातून निवृत्ती घेतल्यानंतर महिला पोलिसांनी दोन्ही सेवानिवृत्त होमगार्ड्सना एका उद्यानात नेले आणि ढोल-ताशांच्या तालावर जल्लोष ( women policemen dance in moradabad ) केला. दोघींवर फुलांचा वर्षाव करून गळ्यात नोटांचा हार घालून त्यांना घरापर्यंत सोडले. मुरादाबादमध्ये महिला पोलिस स्टेशन आणि सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनमध्ये 2 महिला होमगार्ड तैनात करण्यात आल्या होत्या. विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सहकारी महिला होमगार्ड सेवानिवृत्त महिला होमगार्डसह सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यातील आंबेडकर पार्कवर पोहोचल्या. तेथे उपस्थित असलेल्या इतरांनी दोन्ही होमगार्डवर फुलांचा वर्षाव केला. तसेच त्यांना नोटांचा हार घातला. मग ढोलताशाच्या तालावर सर्वांनी नाचत निवृत्त होमगार्ड साथीदारांना ढोल वाजवत त्यांच्या घरी नेले. यावेळी महिला होमगार्डच्या साथीदारांनी निवृत्त सहकाऱ्यांसोबत सेल्फीही काढले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.