Farah Khan in Shirdi : साई बाबांकडे काय मागितले? फराह खानने मिश्किल उत्तर देत म्हटले, मी बाबांकडे... - साई बाबा मंदिर न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर - कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर आता बॉलीवुड कलाकार शिर्डी येथील साई मंदिरात ( Sai Baba temple ) दर्शनासाठी येत आहेत. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री राणी मुखर्जी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आली होती. आज नृत्य दिग्दर्शका फराह खान ( Choreographer Farah Khan ) आणि तिच्यासोबत संजय कपुरची पत्नी महीप कपुर, अभिनेता चंकी पांडेची पत्नी भावना पांडे आणि डिझायनर सुरली पांडे शिर्डीला आल्या. फराह सोबत या सर्वांनी शिर्डीत येवुन साई समाधीचे दर्शन घेतले ( choreographer Farah Khan visited Sai Baba in Shirdi ) आहे. कोविडची परिस्थिती सुधारल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासुन साई दर्शन घेण्याची ईच्छा होती, आज पूर्ण झाली. साईंचे बोलवन आल्याने आज साई दर्शनाला आले असल्याचे फराह खानने सांगितले. साई बाबांकडे काय मागितले, या प्रश्नावर फराह खानने मिश्किल उत्तर देत म्हटले की, साई बाबांकडे मी काय मागितले हे त्यांच्यात आणि माझ्यातच राहील. साई दर्शनासाठी आलेल्या फराह खानने राजकारण आणि बॉलिवूड संबंधी बोलण्यास स्पष्ट नकार दिला. राजकारणावर एव्हढच नाही तर बॉलीवूडवर ही काही बोलण्यास फराहनखानने नकार दिला. आम्ही आमच्या कुटुंबावर साईंचा आशीर्वाद कायम रहावा, यासाठी प्रार्थना करण्यासाठी शिर्डीला आलो असल्याचेही फराह खानने सांगितले.