Mumbai Crime News : पाच कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त; एकास अटक - पाच कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - व्हेल माशाची उलटी विक्री करणाऱ्या मुंबईच्या आरे पोलिसांनी अटक केली आहे. आरे कॉलनी रॉयल पाम परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या व्हेल माशाच्या उलटीची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा वसई परिसरातील रहिवासी आहे. तो इडली सांबर विक्रेता आहे. मात्र, रातोरात करोडपती होण्याच्या लालसेने त्याला कारागृहाच्या तुरुंगात पाठवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पदार्थ विकून आरोपी 50 लाख कमिशन घेणार होते.