Viral Video: Bahubali of Warangal वारंगलच्या बाहुबलीचा 150 किलोचे खताचे पोते घेऊन शेतात फेरफटका - अनिल नरावत वारंगलचा बाहुबली
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16336025-thumbnail-3x2-bahubali.jpg)
अनिल नरावत हा 27 वर्षांचा युवक वारंगलचा बाहुबली Bahubali of Warangal म्हणून ओळखला जातो. वारंगल जिल्ह्यातील चेन्नराओपेट मंडळ, थिम्मरैनी पहाड गावाच्या उपनगरातील चंद्रू थांडा येथील तो रहिवासी आहे. अनिल 50 किलो वजनाचे युरियाचे 3 पोते सहजतेने उचलून घेऊन जातो. अलीकडेच अनिल शेतात खत टाकण्यासाठी डोक्यावर असेच दीडशे किलो वजनाचे पोते घेऊन जात असताना स्थानिक शेतकऱ्यांनी त्याचा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर व्हायरल झाला. सर्व नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर चेन्नराओपेट आणि वारंगलचा बाहुबली म्हणत त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली. याबाबत अनिलला विचारले असता त्याने सांगितले की, अशाप्रकारे वजन उचलणे ही त्याची सवय आहे. स्वत: बनवलेल्या उपकरणांनी तो दररोज व्यायाम करतो, असे त्याने स्पष्ट केले.