VIDEO : नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात जीप गेली वाहून; चालकाला वाचविण्यात पोलिसांना यश

By

Published : Aug 5, 2022, 7:02 PM IST

thumbnail

नांदेड - नांदेड जिल्हात जोरदार पाऊस कोसळतो आहे. यामुळे नद्यांना पूर आल्याने अनेक रस्ते बंद करण्यात आले आहे. इतकेच नाही तर नांदेड शहराच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून लोकांच्या घरात देखील पाणी शिरले आहे. नांदेड जिल्हातील मुखेड तालुक्यात एक जीप पुराच्या पाण्यात वाहून जातानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जिप चालकाला वाचवण्यात पोलिसांना आणि स्थानिक नागरिकांना यश आले. अशोक तुळशीराम राठोड, असे वाचविण्यात आलेल्या जीप चालकाचे नाव आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.