Piyush Goyal Filed Rajya Sabha Nomination : शिवसेनेने केलेला विश्वासघाताचा वचपा काढणार - पियूष गोयल
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - भाजपाच्या तीन उमेदवारांची आज विधानमंडळात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी पियूष गोयल यांनी अर्ज दाखल ( Piyush Goyal Filed Rajya Sabha Candidate Nomination ) केला. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, गेल्या वेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते. त्यावेळी राज्यात भाजप सरकार चांगलं काम करत होते मात्र शिवसेनेने विश्वासघात केल्यामुळेच राज्यात महा विकास आघाडीचे सरकार आले. मात्र आता राज्यसभेच्या निवडणुकीतील भाजप शिवसेनेचा याबाबतचा वचपा काढेल असा इशारा पियुष गोयल यांनी शिवसेनेला दिला आहे. देशात आठ वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. हे सरकार गरीब आणि शोषित वर्गासाठी कटिबद्ध असून, आठ वर्षात मोदी सरकारने केलेल्या कामांमुळे शोषित आणि गरिबांची मन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिंकली. तसेच यावेळी राज्यसभेसाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आपल्याला संधी दिल्या बाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी त्यांचे आभार मानले. तर देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना "आमचे तीन आणि महाविकासआघाडीचे तीन उमेदवार राज्यसभेवर पाठवण्याचे दोन्हीकडून ठरलं तर घोडेबाजार होणारच नाही" असे सूचक वक्तव्य केले आहे.