VIDEO : लोणावळ्यात दोन वर्षीय चिमुकल्याचा स्विमिंग पुलात बुडून मृत्यू - लोणावळ्यात 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
🎬 Watch Now: Feature Video
पिंपरी-चिंचवड - लोणावळ्यात दोन वर्षीय मुलाचा स्विमिंग पुलाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. शिवबा अखिल पवार असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना सहा दिवसांपूर्वी लोणावळ्यात घडली आहे. या घटनेमुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसला आहे. मयत शिवबा आणि त्याच्या जुळ्या बहिणीचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता. परंतु, त्या अगोदरच शिवबाचा मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.