Medical Square Bike Fire : नागपुरात धावत्या दुचाकीने घेतला पेट; पती-पत्नी थोडक्यात बचावले - धावत्या दुचाकीने घेतला अचानक पेट
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - नागपूर शहरातील गजबजलेल्या मेडिकल चौक परिसरात धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेत दुचाकीवरून प्रवास करणारे पती-पत्नी थोडक्यात बचावले आहेत. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी 1 वाजताच्या सुमारस घटली. पारा 45 डिग्रीच्या दिशेने सरकत असल्याने शहरात प्रचंड उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळेच गाडीने पेट घेतला असावा, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. नागपूरच्या वाडी भागातील निवासी अजय व्यवहारे हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीने मेडिकल चौक परिसरात गेले होते. काम आटोपून घरी जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीने पेट घेतला. अवघ्या काही मिनिटात दुचाकी पूर्णपणे जळून राख झाली. दुचाकी पेटल्याची माहिती समजताच अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल होत आग विझवली. महत्वाचे म्हणजे एका आठवड्यातील दुचाकी पेटल्याची ही दुसरी घटना आहे.
Last Updated : Apr 26, 2022, 3:45 PM IST