VIDEO : पावसामुळे वाहतुकीचा रस्ता बंद असल्याने शेतकऱ्याने दूध फेकले पाण्यात - शेतकऱ्याने अनेक लिटर दूध फेकले पाण्यात
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - पावसामुळे वाहतुकीचा रस्ता बंद झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने विक्रीला नेत असलेले दूध फेकून दिल्याचे समोर आले. वैजापूर तालुक्यातील लाडगाव कापूसवडगाव येथील शेतकऱ्यांवर रस्ता नसल्याने दुध पाण्यात ओतून देण्याची वेळ आली आहे. गावातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर पाणी असल्याने संपर्क तुटला. दूध विक्रीसाठी जाता येणार नसल्याने आणलेल्या दुधाचे काय करायचे, असा प्रश्न शेतकऱ्याला पडला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात दूध फेकून आपला रोष व्यक्त केला.