Video : रात्री घराच्या बाहेर झोपणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा.. 'याठिकाणी' वस्तीत बिनधास्त फिरतोय वाघ.. होऊ शकते शिकार - मानवी वस्तीत शिरला वाघ
🎬 Watch Now: Feature Video
वायनाड ( केरळ ) : केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मीनांगडी या रहिवासी भागात मायलंबडी येथे वाघ दिसला. वाघाचे रस्त्यावरून चालतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. गेल्या महिनाभरापासून या भागात वाघांचे वास्तव्य नियमित असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नेरवथ बिनू या मूळच्या घरी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाघ कैद झाला होता. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाघाला तातडीने जेरबंद करावे, अशी स्थानिकांची मागणी आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस याभागात घराच्या बाहेर झोपणाऱ्यांसाठी मात्र ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. या वाघ बाहेर झोपलेल्यांवर हल्लाही करू शकतो. (Tiger Spotted Roaming in Residential Area ) ( Meenangadi in Wayanad District of Kerala )
TAGGED:
मानवी वस्तीत शिरला वाघ