दुचाकीवरून जाताना सेल्फी काढण्याच्या नादात बसला धडक; तिघांचा मृत्यू - up latest news
🎬 Watch Now: Feature Video
फिरोजाबाद - जिल्ह्यात गुरुवारी (24 जून) रात्री झालेल्या अपघातात तीन मित्रांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार तिघे मित्र शहरातून घरी जात होते. त्यानंतर वाटेत त्यांची दुचाकी एका खासगी बसला धडकली. यात तिन्ही मुलांचा मृत्यू झाला. त्याचवेळी आता त्यांचा मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना नरखी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या व्हिडिओमध्ये हे तिघे मित्र बाईकवर मस्ती करताना दिसत आहेत. या तीन मुलांनी चालत्या बाईकवर सेल्फीही काढले आहेत. या तीन मित्रांपैकी शिवम नावाच्या मुलाची शहरात बर्थडे पार्टी होती. त्यात सामील झाल्यानंतर तिघेही एकाच दुचाकीवरून घरी परतत होते. त्यानंतर वाटेत दुचाकीवरील नियंत्रण सुटून बसला धडक दिली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.