Video: पुण्यात ओढ्या लगतची भिंत कोसळली, नागरिकांनीच काढून दिली पाण्याला वाट
🎬 Watch Now: Feature Video
पुणे: पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात ( Heavy Rain In Pune ) झाल्यामुळे अनेक भागांमध्ये भिंत कोसळणे ( Wall Collapse In Pune ) झाड पडणे अशा घटना घडत आहेत. पुण्यातीलच सिंहगड रस्ता येथील हिंगणे परिसरातल्या सुदत्त संकुलजवळ अविनाश विहार सोसायटीच्या जवळ ओढा वाहतो. महापालिकेच्या माध्यमातून या ओढ्याची साफसफाई करण्यात आली होती. मात्र, ओढ्याची स्वच्छता केल्यानंतर राडारोडा तेथेच बाजूलाच टाकण्यात आला. यामुळे वरून येणारे पावसाचे पाणी अडवले ( Rain Water Accumulate ) गेले. त्या पाण्याच्या दाबाने सोसायटी लगत असलेली भिंत पावसाने पडली. नागरिकांनी अथक प्रयत्न करून पाणी जाण्यासाठी रस्ता केला ( citizens removed the water ). त्यामुळे पुढील धोका टळला. भिंत पडल्याने सर्व राडारोडा तसेच दगड सोसायटीच्या आवारात आले आहेत. या ठिकाणची परिस्थिती धोकादायक झाली आहे. अविनाश विहार येथे ए, बी आणि सी अशा तीन विंग आहेत. तिन्ही मिळून येथे सुमारे 36 सदनिका आहेत. महानगरपालिकेचे कर्मचारी कधी मदतीला येतात हे पाहू लागोल. हा राडारोडा काढून लवकर या ठिकाणी पाणी काढून द्यावे त्यामुळे नागरिकांना पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे धोका वाढू शकतो म्हणून लवकरात लवकर महानगरपालिकेने या ठिकाणी काम करावे अशी इथल्या सोसायटीतल्या नागरिकांची मागणी आहे.