Eknath Shinde Thane : कोणी म्हणत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे, तर कोणी त्यांचा निर्णय चूकला; कुटुंबाच्या संमिश्र प्रतिक्रिया - एकनाथ शिंदेंनी उचलेले पाऊल ठाण्याच्या विकासासाठी
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीत राजकीय भूकंप होईल याची कोणाला शक्यताही वाटली नव्हती. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी काही आमदारांना घेऊन बाहेर पडले. त्यांच्या या राजकीय भूकंपावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. मात्र एकनाथ शिंदे यांचे होम पिच असलेल्या ठाण्यातील नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणावर संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेंनी उचललेले पाऊल ठाण्याच्या विकासासाठी योग्य असून शिंदे मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंद होईल, अशी प्रतिक्रिया ठाणेकरांनी दिली आहे. तर दुसरीकडे राज्याला स्थिर सरकार देण्याची गरज असल्याची भावनाही नागरिकांनी बोलून दाखवली आहे.