Video : हत्येच्या आरोपात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांचा परिसराला घेराव - Nagpur Central Jail
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - हत्येच्या आरोपात नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ( Nagpur Central Jail ) न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याचा संशयास्पद मृत्यू ( Suspected death of prisoner in judicial custody ) झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. नातेवाईकांना मात्र नागपूर मेडिकल कॉलेज तथा शासकीय रुग्णालयाबाहेर शवविच्छेदन कक्षाबाहेर गर्दी करत त्याला कारागृहात मारहाण झाली असून त्यात मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. आकाश गौड असे मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव ( Nagpur Central Jail death of prisoner ) आहे. 24 वर्षीय आकाश गौडला नागपुराचा नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत हत्येच्या गुन्ह्यात ऑक्टोबर 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना तो कारागृहात होता. शनिवारी त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारागृहात संशयास्पद मृत्यू झाल्याने रविवारी त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मर्च्युरी बाहेर मोठ्या प्रमाणात कुटुंबियानी गर्दी केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त रुग्णालयात पाहायला मिळाला. संशयास्पद मृत्यू असल्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आकाश गौडवर शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.