SSC Result 2022 : दहावीच्या परीक्षेत जाधवांच्या दादाचा विक्रम; सर्व विषयात 35 टक्के - पुणे 35 टक्के गुण दहावी परीक्षा
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - नुकतचं दहावीचा निकाल जाहीर झाला. अनेकांनी उत्तम गुण मिळवले आहेत. राज्यातील 122 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. मात्र पुण्यातील शुभम जाधव ( Shubham Jadhav Pune 10th 35 percent marks ) या विद्यार्थ्याला सर्वच विषयात 35 टक्के गुण मिळाले आहे. शुभमच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. तो एका दुकानात काम करतो. शिवाय आईवडीलही मोल मजुरी करतात. शुभमने लोकांकडे काम करत हे यश संपादन केल्यामुळे त्यालाही या निकालाचा अभिमान वाटतो. शुभमच्या निकालाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
Last Updated : Jun 17, 2022, 9:20 PM IST
TAGGED:
SSC Result 2022