Pune Shops Fire : पुण्यात दुकानांना भीषण आग; 12 दुकाने जळून खाक, पाहा VIDEO - 12 shops Burn in kharadi pune
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - पुण्यातील खराडी, उबाळे नगर, महालक्ष्मी लॉन्स समोरील दुकानांना आग लागली ( Pune Shops fire ) होती. घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची एकूण 6 वाहने दाखल झाली होती. ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्नीशमन दलाच्या जवानांनी केले. आग का लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पहिल्यांदा आग ही फक्त 2 ते 3 दुकानांना लागली होती. त्यानंतर परिसरातील 12 दुकाने ही आगीत ( 12 shops Burn in kharadi pune ) जळाली. दुकाने जळाल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीत कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. आगीत 12 विविध प्रकारची दुकाने जळाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून कुलिंग देखील करण्यात आले आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.