Sanjay Raut : 'बेईमान, गद्दार शिवसेना नावाचा राजकारणात...'; संजय राऊतांनी बंडखोरांना खडसावलं - sanjay raut marathi news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15656391-thumbnail-3x2-sanjay-raut.jpg)
मुंबई - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्या बैठकीत सहा महत्वाचे ठराव झालं. त्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव इतर कोणत्याही राजकीय संघटनेला वापरता येणार नाही. हे नाव शिवसेनेचं आहे. शिवसेनेसोबत राहील. कोणत्याही बेईमान आणि गद्दार या नावाचा राजकारणात वापरू करु शकणार नाही. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असं राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे.