thumbnail

By

Published : May 4, 2022, 3:55 PM IST

ETV Bharat / Videos

VIDEO : कराडमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत उत्साह, चित्ररथ, श्रीरामाचा पुतळा ठरला आकर्षण...

कराड (सातारा) - हिंदू एकता आंदोलनाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त यंदा कराडमध्ये शिवजयंती उत्सव भव्य स्वरूपात साजरा झाला. मंगळवारी (दि. 3) सायंकाळी काढण्यात आलेल्या दरबार मिरवणुकीत तरूणाईचा सळसळता उत्साह पाहायला मिळाला. चित्ररथ, भगवे फेटे आणि पारंपारिक वेशभूषा केलेल्या महिला, घोड्यावर स्वार झालेल्या तरूण, तरूणी, आंध्र प्रदेशातून आणलेला 15 फुटी श्रीरामाचा भव्य पुतळा हे शिवजयंतीच्या दरबार मिरवणुकीचे आकर्षण ठरले. मिरवणुकीमुळे कराडमधील रस्ते गर्दीने फुलून गेले. पताका, झेंड्यांनी संपूर्ण कराड शिवमय झाले होते. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी देखील या मिरवणुकीला हजेरी लावली. प्रचंड समुदाय पाहून कराडमध्ये भगवे वादळ निर्माण झाल्याचे ते म्हणाले. नगरपालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते हिंदू एकताच्या शिवजयंती मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यामुळेच आतापर्यंतची सर्वात भव्य मिरवणूक कराडकरांना पाहायला मिळाली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.