ETV Bharat / state

भाजपाचे मित्रपक्ष 2029 साली 'कमळा'त विलीन होणार - जयंत पाटील - Jayant Patil

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Jayant Patil राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं बुधवारी लॉंग मार्च काढण्यात आला. यावेळी 2029 साली भाजपाचे दोघे मित्रपक्ष कमळात विलीन होतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

मुबंई Jayant Patil : महात्मा गांधी जयंती निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीन मुंबई शहरात लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्रालयासमोरील महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून रिगल सिनेमा जवळ असलेल्या लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं. लॉंग मार्चला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मित्र पक्ष 'कमळा'त विलीन होतील - देशाचे गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर असताना 2029 साली भाजपा स्वबळावर सत्तेत येईल आणि 2024 विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांच्या मदतीनं सत्तेत येणार असल्याचं ते बोलले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, राज्यातील दोन पक्ष फोडून, 2024 साली निवडणुकीत त्यांचा आधार घेण्याची पाळी भाजपावर आली. तो पक्ष 2029 साली कसा येणार असा खोचक टोला पाटील यांनी भाजपाला लगावला. मित्र पक्षातील बरेच नेते कमळाच्या चिन्हावर उभे राहिले असते. मात्र कमळाची परिस्थिती राज्यात अवघड असल्यामुळे ते कमळावर उभे राहणार नाहीत. तर 2029 साली हे दोघे मित्र पक्ष 'कमळा'त विलीन होतील, मग एकमुखी कमळाचे राज्य आणण्याचा प्रयत्न करतील असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे (संग्रहित छायाचित्र)

जातीय तेढ निर्माण होत आहे - महायुतीतील काही नेत्यांकडून आक्षेपार्ह वक्तव्य केलं जात असून, त्यामुळे जातीय तेढ निर्माण होत आहे. त्यांना आवर घालण्याचे प्रयत्न सत्तेतील प्रमुख नेत्यांकडून केले जात नाहीत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात अशांतता निर्माण करून त्यावर निवडणुकीची पोळी भाजण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार
एकनाथ शिंदे आणि अजित पवार (संग्रहित छायाचित्र)

प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतील - महाविकास आघाडीच्या जागा वाटपात जागा मागणे म्हणजे भांडण नसतं. जागावाटपाची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचं जयंत पाटील म्हणाले. महाविकास आघाडीची पहिली दुसरी तिसरी यादी कधी प्रसिद्ध होणार यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, यादी फायनल झाल्यानंतर प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाचे उमेदवार जाहीर करतील.

हेही वाचा..

  1. महाराष्ट्रात भाजपा १७० पार करणार, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास, संजय राऊत यांच्यावर केली सडकून टीका - Chandrakant Patil
  2. भाजपातर्फे मुंबईत 'भव्य मराठी दांडियाचं' आयोजन; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दांडियाच्या माध्यमातून मतांचा जोगवा? - Navratri 2024
  3. सरकार भपकेबाज; विचारसरणी समजते, एसटीत हवाई सुंदरी आणण्यावरून रोहित पवार संतापले - ST Corporation Chairman

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.