Solapur Shivsena :...अन् उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसेना नेत्या ढसाढसा रडल्या! - ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसेना नेत्या ढसाढसा रडल्या
🎬 Watch Now: Feature Video

सोलापूर - राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला आहे. शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाऊन एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी बंड केला आहे. उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थक असे दोन गट महाराष्ट्र राज्यात निर्माण झाले आहेत. सोलापुरात उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी तातडीची बैठक 23 जून रोजी दुपारी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह येथे घेतली होती. त्यावेळी शिवसेना महिला जिल्हाअध्यक्ष अस्मिता गायकवाड ( Shiv Sena Women District President Asmita Gaikwad Solapur ) बैठकीत बोलताना उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ ढसाढसा रडल्या. यामुळे बैठकीत भावनीक वातावरण निर्माण झाले होते. एकनाथ शिंदे तुम्ही परत, या अशी आर्त हाक यावेळी देण्यात आली.